• Mon. Jun 5th, 2023

लसीकरणासाठी सरपंचांनी मदत करावी-आरोग्यमंत्री राजेश टोपे

    जालना : आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राज्यातील सरपंचांना एक कळकळीची विनंती केली आहे. कोरोनाच्या ओमिक्रॉनचा संभाव्य धोका लक्षात घेता थंड पडलेल्या लसीकरणाला पुन्हा वेग आला आहे. याच लसीकरणाकामी गावागावातील सरपंच विशेष भूमिका बजावू शकतात. लसीकरणासाठी गावागावातील सरपंचांनी मदत करावी. त्यांच्या मदतीशिवाय हे काम अशक्य आहे, असे आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले आहे.

    सोलापूर जिल्हय़ात मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांनी ५५ सरपंचांना लसीकरण करण्यात मदत करत नसल्याप्रकरणी नोटीस बजावली आहे. लसीकरणासाठी राज्यातील सरपंचांनी मदत करावी. त्यांच्या मदतीशिवाय लसीकरणाला वेग येणे शक्य नाही. ते जबाबदार लोकप्रतिनिधी गावस्तरावर असतात. त्यामुळे राष्ट्रीय कामात ते मदत करत नसतील तर ते चुकीचे आहे. त्यामुळे त्यांनी सहकार्य करावे, असं आवाहन टोपे यांनी सरपंचांना केले आहे.

    परदेशातून राज्यात आलेल्यांचा शोध सुरु आहे. वेळप्रसंगी पोलिसांची मदत घेऊन त्यांना शोधणार तसंच त्यांच्या चाचण्या करणार असल्याचेही टोपे यांनी सांगितले. महाराष्ट्रात संक्रमित व्यक्तीकडून कोरोना संसर्ग होण्याचे प्रमाण वाढले आहे. याबाबत काळजी करण्याचे कोणतेही कारण नाही. मात्र नागरिकांनी लसीकरण तातडीने करून घ्यावे. कोरोना नियमांचे पालन करावे, असं आवाहन राजेश टोपे यांनी केले.

    औरंगाबादमध्ये शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी दुसर्‍या डोसचे लसीकरण केल्याची खात्री करूनच विद्यार्थी आणि शिक्षकांना महाविद्यालयात बसू द्या, अन्यथा बसू देऊ नका असे आदेश जिल्हाधिकार्‍यांनी काढले आहे. या आदेशाचे मी सर्मथन करत नाही. मात्र लसीकरण जरी ऐच्छिक असले तरी ते गरजेचे आहे. आज जरी हा निर्णय कायद्यात बसत नसला तरी ते गरजेचे आहे, असंही टोपे यांनी म्हटले आहे.राज्यात सध्या कोरोना संक्रमित व्यक्तींना आपण विलीगिकरणात ठेवत आहोत. त्यांच्या संपर्कात आलेल्या लोकांची आपण ट्रॅकिंग, टेस्टिंग करत आहोत. जे लोक दोन महिन्यांपूर्वी राज्यात विदेशातून आलेले आहे त्यांना शोधून त्यांचे नमुने जिनोमिक सिक्वेसिंगसाठी पाठवले जात असल्याच टोपे यांनी सांगितले.परदेशातून आलेले अनेक जण बेपत्ता झाले असून त्यांना शोधण्यासाठी मिशन मोडवर काम सुरू आहे. वेळेप्रसंगी पोलिसांची मदत घेतली जात असून कोणत्याही परिस्थितीत या लोकांना शोधून त्यांची टेस्ट केली जाणार असल्याची माहिती टोपे यांनी दिली.

gauravprakashan1@gmail.com

Maharashtra News, Braking News, Marathi News, Most Popular Marathi News, Latest Marathi News,Today News,Marathi Article, Marathi Poem, Marathi Story,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *