मुंबई : राज्यातील कोरोना रुग्णसंख्या वाढत असून लोकांकडून नियमांचे पालन केले जात नसल्याने राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी चिंता व्यक्त केली आहे. आपल्याकडे जर सहजासहजी गोष्टी घेतल्या तर याची किंमत संख्यात्मक वाढ होऊन चुकवावी लागेल असे सांगत राजेश टोपे यांनी निर्बंध अजून कडक केले जाऊ शकतात, असा इशारा दिला आहे. लसीकरणातही आपण थोडे मागे असून ते योग्य नाही सांगत त्यांनी ही टक्केवारी वाढवण्यासाठी आवाहन केले आहे. १00 टक्के लसीकरणाचा निर्धार यावेळी त्यांनी व्यक्त केला. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
Thank you for reading this post, don't forget to subscribe!मागील आठ दिवसात पाहिलं तर २0 डिसेंबरदरम्यान महाराष्ट्रात पाच ते सहा हजारांदरम्यान अँक्टिव्ह रुग्ण होते, पण आता महाराष्ट्रात ११ हजार ४९२ रुग्ण आहेत. २0 हजारांपर्यंत हा आकडा जाऊ शकतो. मुंबईची तुलना केली तर मुंबईत ३00 च्या आसपास केसेस होत्या, आज १३00 केसेस आहेत. संध्याकाळी रिपोर्ट होतील त्यातून अंदाजे २२00 केसेस रिपोर्ट होतील.
सात दिवसात सात पटीने रुग्ण वाढले आहेत. दोन दिवसात डबलिंग होत आहे अशी परिस्थिती आहे, अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली.रोज अँक्टिव्ह रुग्णांची संख्या जी नोंदवली जात होती ती ४00 ते ६00 असायची. पण आज दोन हजाराच्या पुढे पॉझिटिव्ह रुग्ण आढळतील अशी परिस्थिती आहे. मुंबईत रोज ५१ हजार चाचण्या केल्या जात आहे. त्यातून २२00 पॉझिटिव्ह येत असतील चार टक्के पॉझिटिव्हीटी रेट आहे जो चांगला नाही. त्यामुळे आपल्याला काळजी घेण्याची गरज आहे, असा इशारा राजेश टोपे यांनी दिला. दिल्लीत बर्यापैकी निर्बंध वाढवण्यात आले आहेत. जुने सर्व निबर्ंध त्यांनी आणले आहेत. मॉल्स, रेस्तराँ, लग्न सर्वांवर निर्बंध लावले आहेत. आपल्याकडे जर आपण सहजासहजी गोष्टी घेतल्या तर याची किमंत संख्यात्मक वाढ होऊन चुकवावी लागेल. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत कोरोनाचे नियम कठोरपणे पाळावे लागतील. पण जर आपण नियम पाळणारच नसू तर निर्बंधांमध्ये काही प्रमाणात वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असं राजेश टोपे यांनी सांगितले आहे.
पुढे त्यांनी सांगितले की, मुख्यमंत्री, टास्क फोर्स आणि आरोग्य विभाग यासंबंधी एकत्रितपणे निर्णय घेईल. मुख्यमंत्र्यांनी कालच्या बैठकीत टास्क फोर्सची बैठक घेऊन वाढत असलेला पॉझिटिव्हिटी रेट, रुग्णसंख्या नियंत्रणात आणण्यासंबंधी सूचना दिल्या. मुख्यमंत्र्यांसोबत आज किंवा उद्या बैठक होणार असून निर्बंध अजून वाढवण्यासंबंधी निर्णय घेतला जाऊ शकतो. यासाठी टास्क फोर्सचं मत विचारात घेतलं जाईल. लग्न किंवा मोठ्या कार्यक्रमांमध्ये नियम न पाळता पार पडत आहेत. त्यामुळे पोलिस आणि प्रशासनाला यावर बंधनं आणावी लागतील, असं राजेश टोपे म्हणाले आहेत. ओमिक्रॉनचे १६७ रुग्ण असून त्यातील ९१ जण बरे झाले असून डिस्चार्ज मिळाला ही जमेची बाजू आहे. कोणाचाही मृत्यू झालेला नाही. पण कोरोनाचे वेगवेगळे व्हेरियंट जास्त चिंतेता विषय आहे, असं त्यांनी सांगितले.