अमरावती : खासदार नवनीत रवी राणा यांच्या या पोषण आहार संदर्भात प्रश्नालाउत्तर देतांना केंद्रीय मंत्री श्रीमती स्मृती इराणी यांचे लोकसभेत उत्तर खासदार नवनीत रवी राणा यांनी लोकसभेत पोषण आहार पुरवठा संदर्भातप्रश्न उपस्थित केला असता महाराष्ट्र राज्याच्या महिला व बालकल्याण विकासविभागाद्वारे केंद्र सरकारचे निर्देश व नियम डावलून कोरोना चे कारण पुढेकरून मोठ्या कंत्राटदारांच्या हितासाठी भोजन पुरावठ्याऐवजी पॅकिंग चाकच्चा आहार पुरवठा पद्धत अंमलात आणली.
यामुळे स्थानिक बचत गट जे वर्षानुवर्षे व्यवस्थित भोजन शिजवून पुरवठा करीत होते त्यांना डावलून कमिशन खोरीसाठी मोठ्या कंपन्या ज्यातील काही ब्लॅक लिस्ट होण्याच्या पात्रतेच्या आहेत अश्या कंपन्यांना महिला व बालकल्याण विकास मंत्री व त्यांच्या विभागाने पुरवठ्याचे आदेश दिले. हा कच्चा आहार निकृष्ट दर्जाचा असून या संदर्भात अनेक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत असे खासदार नवनीत रवी राणा यांनी केंद्रीय महिला व बालकल्याण विकास मंत्री श्रीमती स्मृती इराणी यांचे निदर्शनास आणून दिले.
खा.नवनीत रवी राणा यांच्या या तक्रारीची केंद्रीय मंत्र्यांनी तात्काळ गांभीयार्ने दखल घेऊन या संदर्भात कडक कार्यवाहीकरण्याचे आदेश देत असल्याचे लोकसभेत सांगितले.मेळघाट सारख्या आदिवासी बहुल भागात व राज्यातील इतर भागात गरजूलाभार्थ्यांची होणारी फसवणूक व शासनाची होणारी लूट थांबावी, कुपोषण कमीहोऊन सुदृढ माता व सुदृढ बालक राहावे यासाठी खासदार सौ नवनीत रवी राणायांनी जातीने लक्ष घालून अत्यंत अभ्यासपूर्ण पद्धतीने या प्रश्नांची लोकसभेत मांडणी केल्याने व आता केंद्रीय मंत्र्यानी कठोर कार्यवाहीकरण्याचे निर्देश दिल्याने या गलथान व कमिशनखोर कारभाराला आळा बसेल वकुपोषण कमी होऊन लाभार्थ्यांना उच्च दजार्ची भोजन व्यवस्था उपलब्ध होईलज्यामुळे शासनाचा पैसा ही वाचेल व स्थानिक बचत गटांना रोजगार मिळेल असेमत लाभार्थी व्यक्त करीत आहेत.