• Wed. Jun 7th, 2023

मॅट्रिकपूर्व विविध शिष्यवृत्ती योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन

    मुंबई : समाज कल्याण विभागामार्फत मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येत आहेत. लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन मुंबई शहर व मुंबई उपनगर या जिल्ह्याचे समाजकल्याण अधिकारी यांनी केले आहे.

    सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजनेसाठी उत्पन्न व अर्ज अट नाही अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्ग विद्यार्थींनी या योजनेचा लाभ घेवू शकतात. या शिष्यवृत्तीसाठी पाचवी ते सातवी या वर्गाकरिता ६00 रुपये तर इयत्ती आठवी व दहावी करिता एक हजार रुपये वार्षिक लाभ देण्यात येतो. इयत्ता ९ वी व १0 वी मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्तीसाठी लाभार्थ्याचे उत्पन्न दोन लाखाच्या आत असणे आवश्यक आहे अनुसूचित जातीचे विद्यार्थी या योजनेचा लाभ घेवू शकतात. त्यांना २२५0 रुपए वार्षिक शिष्यवृत्ती देण्यात येते. अस्वच्छ व्यवसायात काम करणार्‍या पालकांच्या मुलांना मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्तीसाठी जातीची अट नाही, अस्वच्छ व्यवसायात काम करणार्‍या पालकांचे प्रमाणपत्र आवश्यक आहे. इयत्ता पहिली ते दहावी करिता वार्षिक तीन हजार रुपये शिष्यवृत्ती देण्यात येते.

    मॅट्रिकपूर्व शिक्षण फी व परिक्षा फी करिता उत्पन्नाची अट नाही, तीन अपत्यपयर्ंत या योजनेतंर्गत फी देता येते, वेळोवेळी विहीत केलेल्या दराप्रमाणे अनूसूचीत जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्गमधील दहावीच्या विद्यार्थ्यांना ३८५ रुपये इतकी वार्षिक शिष्यवृत्ती देण्यात येते. माध्यमिक शाळेत शिकत असलेल्या मागासवर्गीय विद्यार्थांना गुणवत्ता शिष्यवृत्तीसाठी ५0 टक्क्य़ापेक्षा जास्त गुण असणे आवश्यक आहे. अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्ग विद्याथ्यार्नी ही शिष्यवृत्ती देण्यात येते.

    अनुसूचीत जातीमधील इयत्ता पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांनी वार्षिक ५00 रुपये अनुसूचीत जातीच्या इयत्ता आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना वार्षिक एक हजार, विमुक्त जाती भटक्या जाती विशेष मागास प्रवर्ग साठी दोनशे रुपये तसेच विमुक्त जाती भटक्या जमाती विशेष मागास प्रवर्ग साठी ४00 रुपये वार्षिक शिष्यवृत्ती देण्यात येते.

gauravprakashan1@gmail.com

Maharashtra News, Braking News, Marathi News, Most Popular Marathi News, Latest Marathi News,Today News,Marathi Article, Marathi Poem, Marathi Story,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *