मुंबई : बॉलीवूड अभिनेता रितेश देशमुख आणि पत्नी जेनेलिया यांची जोडी ही एक लोकप्रिय जोडी आहे. दोघेही सोशल मीडियावर सक्रिय असतात. नुकतीच त्या दोघांनी एका कार्यक्रमात हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी त्यांच्या लग्नाविषयी अनेक गोष्टी सांगितल्या आहेत.
रितेश आणि जेनेलियाने लेडिज व्हर्सेस जेन्टलमेंट २ च्या सीजनमध्ये हजेरी लावली होती. यावेळी जेनेलिया म्हणाली, जेव्हा त्यांचे लग्न झाले त्यावेळी ती रोज सकाळी उठून सलवार-कमीझ परिधान करायची आणि दागिने घालायची.
त्यानंतर तिला त्याचा कंटाळा आला. लग्नाच्या १ महिन्यानंतर ती रडली आणि रितेशला म्हणाली, मी आता हे करू शकत नाही. जेनेलिया म्हणाली, जेव्हा माझे लग्न झाले, तेव्हा मला हे एक आदर्श वाटले होते. रोज सकाळी मी सलवार-कमीझ घालून यायचे आणि माझी चिडचिड व्हायची की, मला तयार व्हावे लागत आहे.