• Sun. May 28th, 2023

माहिती व जनसंपर्क महासंचालक दिलीप पांढरपट्टे यांची जिल्हा माहिती कार्यालयाला भेट

    यवतमाळ : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे सचिव तथा महासंचालक डॉ. दिलीप पांढरपट्टे यांनी आज यवतमाळ जिल्हा माहिती कार्यालयात भेट दिली.

    यावेळी त्यांनी अधिकारी व कर्मचार्‍यांशी चर्चा करून यवतमाळ जिल्ह्यातील वैशिष्ट्यपूर्ण माहिती, पर्यटन स्थळे, प्राचीन मंदिरे, अभयारण्य तसेच येथील साहित्यिक, कलावंतांची माहिती जाणून घेतली.

    याप्रसंगी माहिती व जनसंपर्कच्या नागपूर-अमरावती विभागाचे संचालक हेमराज बागुल, जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे, माहिती सहायक गजानन जाधव, वरिष्ठ लिपीक सचिन उईके, शितल गोधणे, नरेंद्र गावंडे, वनिता नेवारे इ. अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

gauravprakashan1@gmail.com

Maharashtra News, Braking News, Marathi News, Most Popular Marathi News, Latest Marathi News,Today News,Marathi Article, Marathi Poem, Marathi Story,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *