• Mon. May 29th, 2023

मास्क घातल्यामुळे डोळ्यांशी संबंधित समस्या…!

    कोरोना विषाणूमुळे मास्क घालणं आयुष्याच भाग बनून गेलं आहे. न्यू नॉर्मल असं म्हणत आपण मास्क स्वीकारलं आहे. कोरोनापासून बचाव करण्यासाठी मास्क घालणं आवश्यक असलं तरी याचे बरेच दुष्परिणाम दिसून येतात. बराच वेळ मास्क घालणार्‍यांना त्वचेशी संबंधित आजार होतात. इतकंच नाही तर आता मास्कमुळे डोळ्यांशी संबंधित तक्रारी वाढू लागल्या आहेत. बराच काळ मास्क घातल्यानंतर डोळ्यांमध्ये होणारी जळजळ ही सर्वसामान्य बाब बनून गेली आहे. चुकीच्या पद्धतीने मास्क घातल्यामुळे डोळ्यांशी संबंधित समस्या उद्भवत असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. मास्क चुकीच्या पद्धतीने घातल्यास किंवा नाक उघडं राहिल्यास उच्छवासावाटे बाहेर पडणारी उष्ण हवा डोळ्यात जाऊन डोळे कोरडे पडतात. या हवेमुळे नैसर्गिक अर्शू वाळून डोळ्यांचा दाह होतो. मास्क बराच काळ घातल्यानंतर पापण्यांलगतचा जंतूसंसर्ग, बुब्बुळांचं होणारं नुकसान, मास्कवर राहिलेल्या साबणाच्या कणांमुळे डोळे खाजणं अशा समस्या घेऊनही रुग्ण येत आहेत. कोरोना महामारीच्या काळातला ताण आणि काळजी यामुळेही डोळ्यांच्या समस्या उद्भवत असल्याचंही तज्ज्ञ सांगत आहेत.

    डोळ्यांच्या समस्या टाळण्यासाठी मास्क नीट घाला. मास्कने फक्त तोंड झाकणं, सैल मास्क घालणं यामुळे नाकातून बाहेर पडणारी गरम हवा अगदी सहज डोळ्यांपर्यंत पोहोचते आणि त्रास सुरू होतात. बाजारात वेगवेगळ्या प्रकारचे मास्क मिळतात. चेहर्‍यावर नीट बसणारं तसंच आरामदायी कापडापासून तयार करण्यात आलेलं मास्क वापरा. मास्क घालताना किंवा काढताना डोळ्यांना हात लावू नका. खाजवण्यासाठी डोळ्यांना हात लावण्याची इच्छा होऊ शकते. पण ते शक्यतो टाळा. डोळे चुरचुरत असतील तर एखादा गरम कपडा डोळ्यांवर ठेवा. यामुळे तुम्हाला बरं वाटेल. तुमचा स्क्रिन टाईमही कमी करा. सतत मोबाईल किंवा लॅपटॉपसमोर बसल्यानेही डोळ्यांना त्रास होऊ शकतो. त्यामुळे कोरोनाकाळात डोळ्यांबाबत सजग व्हायला हवं.कोरोना विषाणूमुळे मास्क घालणं आयुष्याच भाग बनून गेलं आहे.

    न्यू नॉर्मल असं म्हणत आपण मास्क स्वीकारलं आहे. कोरोनापासून बचाव करण्यासाठी मास्क घालणं आवश्यक असलं तरी याचे बरेच दुष्परिणाम दिसून येतात. बराच वेळ मास्क घालणार्‍यांना त्वचेशी संबंधित आजार होतात. इतकंच नाही तर आता मास्कमुळे डोळ्यांशी संबंधित तक्रारी वाढू लागल्या आहेत. बराच काळ मास्क घातल्यानंतर डोळ्यांमध्ये होणारी जळजळ ही सर्वसामान्य बाब बनून गेली आहे. चुकीच्या पद्धतीने मास्क घातल्यामुळे डोळ्यांशी संबंधित समस्या उद्भवत असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. मास्क चुकीच्या पद्धतीने घातल्यास किंवा नाक उघडं राहिल्यास उच्छवासावाटे बाहेर पडणारी उष्ण हवा डोळ्यात जाऊन डोळे कोरडे पडतात. या हवेमुळे नैसर्गिक अर्शू वाळून डोळ्यांचा दाह होतो. मास्क बराच काळ घातल्यानंतर पापण्यांलगतचा जंतूसंसर्ग, बुब्बुळांचं होणारं नुकसान, मास्कवर राहिलेल्या साबणाच्या कणांमुळे डोळे खाजणं अशा समस्या घेऊनही रुग्ण येत आहेत. कोरोना महामारीच्या काळातला ताण आणि काळजी यामुळेही डोळ्यांच्या समस्या उद्भवत असल्याचंही तज्ज्ञ सांगत आहेत.

    डोळ्यांच्या समस्या टाळण्यासाठी मास्क नीट घाला. मास्कने फक्त तोंड झाकणं, सैल मास्क घालणं यामुळे नाकातून बाहेर पडणारी गरम हवा अगदी सहज डोळ्यांपर्यंत पोहोचते आणि त्रास सुरू होतात. बाजारात वेगवेगळ्या प्रकारचे मास्क मिळतात. चेहर्‍यावर नीट बसणारं तसंच आरामदायी कापडापासून तयार करण्यात आलेलं मास्क वापरा. मास्क घालताना किंवा काढताना डोळ्यांना हात लावू नका. खाजवण्यासाठी डोळ्यांना हात लावण्याची इच्छा होऊ शकते. पण ते शक्यतो टाळा. डोळे चुरचुरत असतील तर एखादा गरम कपडा डोळ्यांवर ठेवा. यामुळे तुम्हाला बरं वाटेल. तुमचा स्क्रिन टाईमही कमी करा. सतत मोबाईल किंवा लॅपटॉपसमोर बसल्यानेही डोळ्यांना त्रास होऊ शकतो. त्यामुळे कोरोनाकाळात डोळ्यांबाबत सजग व्हायला हवं.

gauravprakashan1@gmail.com

Maharashtra News, Braking News, Marathi News, Most Popular Marathi News, Latest Marathi News,Today News,Marathi Article, Marathi Poem, Marathi Story,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *