माळावरची बाभूळ…

  “सूर्य उगवला, प्रकाश पडला
  आडवा डोंगर, आडgवा डोंगर
  तयाला माझा नमस्कार”

  असं शाहीर डपाची थाप मारत जीव तोडून गात असतांना सूर्याच्या प्रकाशाला अडविणारा डोंगर त्याच्या कवनातून सुटत नाही. जिथं सूर्यांची अडवणूक निसर्गानचं केली तिथं सामान्य माणसाची व्यथा काय असतील, विचारच नको.जत तालुका मोठा असला तरी पूर्णतः दुष्काळी भाग म्हणून होरपळत राहिला. ज्याला भूक सहन झाली ते तिथंच तटुन राहिले ज्याला पर्यायच उरला नाही ते गावं सोडून ” गुळकरी ” झाले.अाणि आयुष्यभर भुकेला टक्कर देत आपल्या आयुष्याचं “सोनं” केलं काही अजूनही त्याचं अवस्थेत राहत आहेत.मात्र इथला “गुळकरी ” नविन ठिकाणी सामावून जाताना ज्या खस्ता खाल्या, ज्या वेदना सोसल्या त्या शब्दांत मांडतानासुधा शब्दालाच घाम आला असेल.

  Thank you for reading this post, don't forget to subscribe!

  हरीचं गावं गोधळेवाडी,कोंबड्यांना दाणे विस्कटल्यासारखी घरे तेही धाब्याची,गरीबी प्रत्येकाच्या पाचवीला पुजलेली. गावच्या बाहेर एक ओढा तोही कोरडा पाऊस आला तरच वाहणारा, गावात मरगोबाईचं मंदिर छोटसं,वर्षातून एकदा यात्रा भरते बोकड,कोबड्या यांचा बळीचा प्रसाद. देशोधडीला गेलेली चाकर माणसांची श्रध्दास्थान हे देऊळ,अन् या देवळाभोवती फे-या मारतात आणि वर्षभर पुन्हा पोटासाठी पाखरासारखी अन्नाच्या अन् अस्तित्वाच्या शोधासाठी वाटेल ते,पडेल ते काम करुन पोटाची खळगी भरण्यासाठी दुनियाभर फिरत राहतात. एकटा गेला की त्याच्याबरोबर एक एक घर देशोधडीला लागते. गाव ओस पडते, घरे वाट पाहत राहतात, आपल्या लोकांची, झुरत राहतात, ढासळतात,पडतात, इकडे देशोधडीला गेलेले मनाने ढासलेले असतात घरासारखेच.काही ठिकाणी त्यांचा स्विकार गाव करते तर काही ठिकाणी त्यांचा स्विकार न होतच नाही,गावातील लोक हळू हळू अशा लोकांना विसरतात, मध्येच लटकत राहतात गावचा पत्ता खिशात ठेवून.

  गोंधळेवाडी “तून आयुष्याचा गोंधळ घालत निघालेले गुरव कुठुंब विजापूर, जत,मिरज,सांगली,या गावाच्या आसाभोवती फिरत राहिले, दगडी चाळीतलं वास्तव, साखर कारखान्यात तुटपंजा पगारावर आयुष्य काढतांना असंख्य अडचणी आल्या,आईने जीवाचं रान करुन संसार केला, पदरी चार पोर पोसतांना ज्या खस्ता खाल्या त्या वर्णन करता येण्यासारख्या नाहीत,हरी,विठ्ठल दादा यांनी अनेक अंगमेहनितीची कामे करता करता गरिबीचा अंगार उगळून पित पित मान,अपमान,अवहेलना,नातेवाइकांचा दुरावा हे
  दगडी चणे पचवतांना शिक्षणांची नाळ मात्र यांनी सोडली नाही प्रसंगी सहा सहा दिवस उपाशी राहून अक्षर गिरवतांना डोळ्यात एका थेंबालाही आसरा दिला नाही. हरीचे बाबा एक अवलियाच होते ,धिपाड देह बोलायला लागले की ऐकत राहावे असे वाटे,त्यांच बोलण तसं असायचे पुरुषाने कसं असावं हाबद्दल सांगतांना म्हणायचे,पुरुष कसा कामाळू असावा नाहीतर चुलीपुढं बसायचा अन् म्हणायचं,” मी बघतो तुझ्या भांगाकडे अन् तू बघ माझ्या अंगाकडे “

  असे म्हणायचे आणि मोठ्याने हसायचे ,असे अनेक जीवनाची तत्वे बाबाकडे असायचे ,दुःख कसं पचवायचे ते त्याच्याकडून शिकावं,प्रसंगी रागावणारे बाबा ,मुलं दिसली नाहीतर तळमळणारे बाबा आम्ही अनुभवलायं .डोळ्यांना निट दिसत नसले तरी कोणतीही सबब ते सांगत नसतं ,आईनेही अनेक अंगमेहनतीची कामे केली .असे हे हरीचे जीवन चक्रीवादळ होते ते आयुष्याच्या वाटेवर वाहत गेले नाही तर तटस्थ उभे राहिले ,प्राथमिक शिक्षण घेतांना आलेली संकटे ,बोर्डिगचे जीवन ,तेथील अन्न, उपासमार हे सोसत शिक्षणाची श्रीगणेशा रंगविलेली,खेळ, नाट्य कला याही बाबतीत तो कोठेच कमी दिसत नाही .मला हे करायचे आहे हे एकदा ठरवले की, त्या धैयपुर्तिसाठी वाटेल ते कष्ट करण्याची तयारीचं असायची. प्राध्यापक असतांना पुस्तकीज्ञानापेकक्षा जीवन जगण्याची, परिस्थितीचे भान मुलांच्या मनावर बिबंवले, व प्राध्यापक कसा असावा हे दाखवून दिले, नोकरी सोडतांची खंबीरवृत्ती कौतुकास्पद आहे कारण त्याचे त्याच्यावर भरोसा, विश्वास होतो, येथेही अनेक प्रसंगाला तो खंबीरपणे समोर गेला,

  मी या अशा अनेक घटनांचा साक्षीदार आहे .रोखठोक स्वभाव, जीद्द, कष्ट करण्याची उर्मी हेच हरीला वरच्या पदावर पोहचवते काळजाला कापत जाणा-या, वेड्यावाकड्या वाटा,रात्रीच्या भयान काळोखात प्रकाश शोधणारे मन,उन्हांच्या लाहिने शेकून निघाले, मनात मान अपमानाच्या जल्लोशाचा सुंबळ वाजत होता, मन बधीर होत होते, स्वप्न व सत्याच्या पायघडी तुडवतांना छिन्नविच्छिन्न होणा-या भावना आपण कशा मुठीत धरुन ठेवल्या हे कळाले नाही,अपमानाच्या वादळात तरतांना विठ्ठलदादा,आई,बाबा,मित्र याचे भावस्पर्शाचा उमाळा मनाला धीर देत गेला आणि हरी नावा फिनिक्स पुन्हा राखेतून उडाला आणि एकेक थर-अस्तर खोदत खोल जातानाचे शब्दातील श्वासाचे हुंकाराचा बोध आपणास “माळावरची बाभळ”वाचतांना निश्चित जाणवेल. अशा माझ्या जीवाभाच्या मैतराचे शब्द विश्वात विश्वासाने सोबत करण्याचे भाग्य मला लाभले आणि माझ्यासारख्या शब्दांच्या अंगाराशी खेळणाऱ्या कवीला प्रस्तावना लिहिण्यास आवर्जुन सांगून मित्रत्वाच्या प्रेमळ नात्याची पुन्हा नव्याने मायेची पालवी फुटल्याचा भास मला होतोय, या पुस्तकाचे स्वागत सर्व करतील “माळावरची बाभूळ ” साहित्यात अनेक सारस्वतांना आपल करील हीच सदिच्छा!

  लेखक हरी नागेंद्र गुरव
  मुबारक उमराणी
  सांगली
  ९७६६०८१०९७.