- परतेक मानुस येगळा
- ईचारसरनी त्याची येगळी
- वारे मानसा तुयी हाय
- कहानी येगळी आगळी !!
- नात्यात नातं कोनतबी
- चुलता,सगा,का दोस्त
- मतभेद रायले तरीबी
- नात तोडन्याची करु नगा गोष्ट !!
- बाप असो का पोरगा
- सुन या पोरगी असे
- माय लेक, नवरा बायुको
- झगडा परतेक नात्यात दिसे !!
- व्यक्ती तितक्या परकृती
- काई सोडाच काई धराचं
- गाडी चालवाच लागते
- राग धरुन नाई चालाचं !!
- चुकलं तर समजवाचं
- येकामेकाले घिवून चालाचं
- आमने-सामने बसून
- अंतरंगात डोकावाचं !!
- मानसा मानसात कायले
- राग,लोभ, मत्सर,पाईजेन
- झालं गेलं इसराच,
- थ्याच भूमिकाची ठिवाची ठसन !!
- आयुष्य लय लयान हाय
- हा,हा म्हनता संपून जाईन
- पिरेम कराचं राहून गेलं
- थेच खंत मनात राहीन !!
- मानसा तुच मानसाले
- समजून घ्यायले शिक
- पाऊलो पावली तुले मंग
- भेटत जाईन जगन्याची खरी ट्रिक !!
- हर्षा वाघमारे
- नागपूर