• Sun. May 28th, 2023

“मानवमुक्तिची चळवळ गतीशील करण्याची गरज” – प्रा.श्रीकृष्ण बनसोड

  * म.फुले स्मृतिदिनी क्रांतीरत्न महाग्रंथाचे थाटात प्रकाशन

  अमरावती : येथील वऱ्हाड विकास तर्फे समाज क्रांतीसूर्य महात्मा फुले यांच्या स्मृतिदिनी *क्रांतिरत्न* या महाग्रंथाचे मान्यवरांच्या हस्ते थाटात लोकार्पण करण्यात आले. स्थानिक वऱ्हाड विकास तर्फे राम नगर येथील सावता सभागृहात म. फुले पुण्यतिथी निमित्त सत्यशोधक विचारवंताचे व्याख्यान थाटात संपन्न झाले.

  कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपेक्षित समाज महासंघाचे अध्यक्ष प्रा. श्रीकृष्ण बनसोड तर प्रमुख अतिथी माहिती व जनसंपर्क विभागाच्या सहाय्यक संचालक अपर्णा यावलकर, सामाजिक कार्यकर्त्या डॉ.रजिया सुलताना, डॉ. सतीश पावडे, प्रा. डॉ. सुनंदा खेरडे,ओमप्रकाश अंबाडकर,डॉ. निखिल चांदुरकर,प्रा. एन. आर. होले, नंदकिशोर वाठ, सुहास डांगोरे, संजय देवळे,गोविंद खवले,स्मिता घाटोळ ,डाँ.निलिमा उमप डाँ.प्रवीण बनसोड (नेर)आदी मान्यवर उपस्थित होते.

  दीप प्रज्वलना नंतर कवी प्रा. अरुण बुंदेले यांनी “महात्मा फुले” वंदनगीत व स्वागतगीताचे गायन केले.प्रा. डॉ. सुनंदा रामकृष्ण खेरडे यांना उपस्थित मान्यवरांनी सन्मानपत्र ,शाँल ,पुष्पगुच्छ ,मोमेंटो देऊन “ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले ज्ञानगौरव पुरस्काराने” सन्मानित केले.सन्मानपत्राचे वाचन ऍड. प्रभाकर वानखडे व डाँ. निलिमा उमप यांनी केले.यानंतर फुलेविचार पीठावर उपस्थित अतिथीच्याहस्ते क्रांतीरत्न महाग्रंथाचे लोकार्पण थाटात संपन्न झाले. सदर ग्रंथ निर्मिती करीता निवासी जिल्हाधिकारी राजेश खवले,अधिकारी विश्वनाथ शेगोकार,सेवा निवृत्त उपजिल्हाधिकारी अशोक गेडाम यांच्या मार्गदर्शनातून एक हजार पृष्ठाचा क्रांतीरत्न ग्रंथ साकार झाल्याची माहिती संपादक डॉ. सतीश पावडे यांनी मनोगत व्यक्त करतांना दिली.या ग्रंथात राज्यातील 143 लेखकांचे अभ्यासपूर्ण लेखांचा समावेश असल्याचे डॉ. रजिया सुलताना यांनी मनोगता मधून सांगितले.तर क्रांतीरत्न ग्रंथातील म. फुलेंचे विचार व तत्वज्ञान फुले, शाहू, आंबेडकर अनुयायी यांनी आत्मसात करावे असा सल्ला सहा. संचलिका अपर्णा यावलकर यांनी दिला.

  अध्यक्षीय भाषणातून प्रा. श्रीकृष्ण बनसोड यांनी “म. फुले यांनी शिक्षणाची कवाडे सर्वांसाठी खुली केली तसेच अस्पृश्यता व जातीभेद संपविण्यासाठी सर्वकष लढा दिला.त्यांची मानवमुक्तीची चळवळ गतीशील करण्याचीआज गरज असल्याचे प्रतिपादन केले. याप्रसंगी प्रा.अरुण बुंदेले यांनी “क्रांतिसूर्य महात्मा फुले “या स्वरचित अभंगाचे सुमधूर आवाजात गायन करुन सर्वांना मंत्रमुग्घ केले.

  कार्यक्रमाला जयश्री कुबडे, डॉ. अस्मिता बनसोड, प्रा. साहेबराव निमकर, वसंत भडके, गोविंद फसाटे, शालिनी मांडवधरे, मधुकर आखरे,डी. एस. यावतकर,प्राचार्य दत्तात्रय गणगणे,इंजि. सुधाकर विरुळकर, नंदा बनसोड,रेखा इंगळे, मेघा पाचघरे,पद्मा घरडे,प्रमिला खवले, प्रा. प्रदीप शेवतकर,प्रा. शरद वऱ्हेकर, गणेश मानकर,माणिक लोखंडे,कल्पना होले, मालती खवले,रामकुमार खैरे, सुधीर घुमटकर शिवचरण उमप,प्रा.किशोर कळसकर,प्रा.शरद वऱ्हरकर ,सौ.विधळे, नलिनी भेलकर आदी मान्यवर उपस्थित होते. बहारदार संचालन प्रा. डॉ उज्वला सुरेश मेहरे यांनी तर आभार स्मिता संजय घाटोळ यांनी मानले.कार्यक्रमाची सांगता अल्पोपहाराने झाली.

gauravprakashan1@gmail.com

Maharashtra News, Braking News, Marathi News, Most Popular Marathi News, Latest Marathi News,Today News,Marathi Article, Marathi Poem, Marathi Story,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *