Contents hide
माझा भीमा माझ्यासाठी
झाला पुस्तक नि पाटी
माझ्या हाती दिलं त्यानं
जगी लढण्याची काठी
न्याय समता स्वातंत्र्य
प्रज्ञा शील शिस्त ज्ञान
आम्हा शिकवून बाबा
दिला हो मान सन्मान
शिका नि संघटित व्हा
लढा हाच दिला नारा
ज्ञानातून दूर केला
अंधःकार तुच सारा
बाबा रे तुझ्यामुळेच
पाणी चवदार कळे
तुच फुलवले मनी
सुख स्वप्नांचेच मळे
हाती संविधान देता
प्रज्ञासूर्य प्रकाशित
तेजोमय मीच झालो
पुस्तकाशी केली प्रीत
तुच उध्दारिले मज
देत देत बुध्दी प्राण
पेटवली ज्ञानज्योत
नष्ट केले दुःख त्राण
– मुबारक उमराणी
सांगली
मो.९७६६०८१००७