• Sat. Jun 3rd, 2023

महिला शेतकरी सन्मान वर्ष म्हणून २0२२ साजरे करणार

    पुणे : राज्यात २0२२ हे वर्ष महिला शेतकरी सन्मान वर्ष म्हणून साजरे करण्यासाठी प्रारूप आराखडा तयार करण्याचे काम सुरू असून लवकरच महिला शेतकर्‍यांबाबत धोरण तयार करण्यात येणार आहे. ज्याद्वारे महिला शेतकरी आणि शेतमजूर महिलांचे सक्षमीकरण वेगवेगळ्या कृषी योजनेच्या माध्यमांतून करण्यासाठी राज्यसरकार प्रयत्नशील असल्याची माहिती राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

    महिला सन्मान वर्षाच्या धोरणनिश्‍चितीसाठी राज्यस्तरीय महिला शेतकर्‍यांचे पहिले चर्चासत्र कृषी आयुक्तालयातील पद्मश्री सभागृहात सकाळी झाले. त्यानंतर सायंकाळी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी कृषी आयुक्त धीरज कुमार व अन्य कृषी संचालक उपस्थित होते. कृषी व कृषी संलग्न व्यवसायात यशस्वी काम केलेल्या महिलांचे मार्गदर्शन, सूचना यावेळी ऐकून घेण्यात आल्या. त्या सर्व मुद्यांची नोंद घेत त्याचे प्रारुप मंत्रिमंडळासमोर ठेवण्यात येणार आहे. शेतीतील कल्पक तसेच नवीन प्रयोगांची माहिती महिला शेतकर्‍यांना व्हावी यासाठी आत्मामार्फत शेतपाहणी, प्रशिक्षण व भेट, कृषी सहलींसाठी जास्तीत जास्त निधीची तरतूद केली जाईल. महिला शेतकरी, शेतमजुरांसाठी कृषी विभागाच्या सर्व योजनांमध्ये ३0 टक्के प्रमाण राखीव असून कृषी व अन्न प्रक्रिया उद्योगामध्येही महिलांसाठी ३0 टक्के राखीव प्रमाण ठेवण्यात येत आहे. शेतकरी उत्पादक कंपन्यांमध्ये किमान वीस टक्के महिला संचालक आणि तीस टक्के महिला सभासद हव्यात अशाही सूचना देण्यात आल्याचे ते म्हणाले.

    महिलांचे सात बारा उतार्‍यावर नांव लावणार

    महिलांना कृषी विभागाच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी सात बारा उतार्‍यावर महिलांचे नाव असणे गरजेचे आहे. त्यासाठी शासनाने सात बारा उतार्‍यावर महिलांचे नाव लावण्याची प्रक्रिया अत्यंत सोपी केली आहे. ज्या कुंटुंबातील महिलेचे नांव सात बारा उतार्‍यावर लावयाचे आहे, त्यांनी तहसिलदारांकडे अर्ज केल्यानंतर तीन आठवड्यांच्या आत ते नांव लावण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

    अवकाळी पाऊस, चक्रीवादळ अशा नैसर्गिक आपत्तीमुळे झालेले शेतकर्‍यांची नुकसानभरपाईसाठी राज्य शासन सर्व ते प्रयत्न करीत आहे. शेतकरी, राज्य शासन आणि केंद्राचा हिस्सा मिळून एकूण २ हजार ३१४ कोटी रुपये विम्याचा हप्ता कंपन्यांना देण्यात आला होता. त्या बदल्यात आतापयर्ंत विमा कंपन्यांकडून २ हजार ४५0 कोटी रुपयांची नुकसान भरपाई शेतकर्‍यांना मिळाल्याची माहितीही कृषी मंत्री भुसे यांनी दिली.

gauravprakashan1@gmail.com

Maharashtra News, Braking News, Marathi News, Most Popular Marathi News, Latest Marathi News,Today News,Marathi Article, Marathi Poem, Marathi Story,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *