करणाऱ्या
विश्वरत्न
महामानवा
मानवी मूल्यांचा
कोरा चेक साइन
करून दिलास
आम्हां
वंचित, शोषित
उपेक्षित
बहुजनांना
आमचा प्रत्येक
दिवस
हा
संविधान दिन असतो
सूर्य उगवतो
अन मावळतो
तू मात्र
भीमसूर्या
दिनरात
उगवतच राहतो
तू
आमच्या आज्याचा
बापाचा
माझ्या लेकाचा
अन
माझाही बाप
झालास
तुला वंदावे
येथील समस्त
सृष्टीने
एवढी अगाध
लीलया केलीस
महामानव
आमच्या
भाकरीच्या
प्रत्येक घासावर
तुझी सही आहे
आमची सुखाची
झोप
तू रात्र जागून
आम्हांस दिली
महामानव
तू
बरबाद झालास
आमच्या
कल्याणासाठी
लढत राहिलास
अखेरचा श्वास
संपेपर्यंत
आम्ही मात्र करंटे
तुला समजूनच
घेतले नाही
अजूनही
महामानवा
तुझा मानवमुक्तीचा
लढा
नुसताच
चघळत बसलो
भव्यदिव्य
रंगमंचावर
भाषणातून
तुझ्या दिशानिर्देश
केलेल्या बोटावर
लक्षच
दिल नाही आम्हीं
तु दिलेलं टार्गेट
नवं भारताच्या
निर्मितीच
आज अजूनही
तसच पडून आहे
लोकशाहीच्या
दरबारात
नुसत्याच वलग्ना
तुझ्या
संविधानाची
चिरफाड राजरोस
सुरू आहे
आम्हीं मात्र
तुझ्या जयजयकारात
गुंग आहोत
महामानव
आज तुझा
पासष्टवा महापरिनिर्वाण दिन
माझ्या देहाची
कातडी सोलून
जरी तुला मानवंदना
दिली तरी
कमी पडावी
एवढे थोर तुझे
उपकार
आमच्या समस्त
भारत वासीयांवर
सलाम तुला
महामानवा
त्रिवार…!
– राजेंद्र क.भटकर
” राजगृह “
अलंकार पार्क बडनेरा
अत्यंत भावपूर्ण अभिवादन.
मी होऊ कसा उतराई!
भिमा तुझीच रे पुण्याई!!