महापरिनिर्वाण दिन व निबंध स्पर्धेचे आयोजन

    अमरावती : ज्ञानाचा अथांग सागर, महामानव, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा सुर्ला येथे साजरा करण्यात आला.

    Thank you for reading this post, don't forget to subscribe!

    उपस्थित मान्यवर ,सर्व शिक्षक व विध्यार्थ्यांनी मौन पाळून डॉ.बाबासाहेबांना अभिवादन केले.महापरिनिर्वाण दिन निमित्ताने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवन कार्य या विषयावर मराठी भाषा संवर्धन संस्थेच्या वतीने निबंध लेखन स्पर्धा घेण्यात आली. या प्रसंगी मराठी भाषा संवर्धन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री सुरेश पेंढरवाड यांनी जिल्हा परिषद शाळेला डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा भेट दिली.

    कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री महेंद्र मेश्राम होते.तर प्रमुख अतिथी म्हणून सरपंच सौ. उषाताई दिवाकर कुडमेथे, उपसरपंच श्री चंद्रशेखर मेश्राम , शाळा व्यवस्थापन समितीच्या उपाध्यक्षा सौ.मीनाताई कणाके, सदस्य अरविंद घोरपडे , सुषमा दुधगवळी, विठ्ठल कोडापे, सपना दुधगवळी, संतोष आत्राम, शुभांगी सराटे, संतोष दूधगवळी सदस्य उपस्थित होते.

    कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुरेश पेंढरवाड यांनी केले.प्रास्ताविक जेष्ठ शिक्षक श्री राजेश मेश्राम यांनी तर आभार राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त आदर्श शिक्षक तथा मुख्याध्यापक श्री रमेश बोबडे यांनी मानले. या प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला.कार्यक्रमाला श्री गंगाधर बलकी, विध्यार्थी व पालक उपस्थित होते.