• Wed. Jun 7th, 2023

भिकार्‍यांसाठी कल्याणकारी उपायांसह अनेक योजना-डॉ. वीरेंद्र कुमार

    नवी दिल्ली : देशात २0११ मध्ये झालेल्या जनगणनेनुसार, ४,१३,६७0 भिकारी आणि बेघर आहेत. यामध्ये महाराष्ट्रातील एकूण २४,३0७ भिकार्‍यांचा समावेश आहे. यात १४0२0 पुरुष तर १0२८७ महिला आहेत. भीक मागण्यार्‍या व्यक्तींसाठी कल्याणकारी उपायांसह अनेक व्यापक उपायांचा समावेश आहे. पुनर्वसन, वैद्यकीय सुविधांची तरतूद, समुपदेशन, मूलभूत दस्तावेजीकरण, शिक्षण, कौशल्य विकास, आर्थिक संबंध इत्यादींवर या योजनेचा भर आहे. सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्री डॉ. वीरेंद्र कुमार यांनी सोमवारी लोकसभेत एका लेखी उत्तरात ही माहिती दिली.

    भिकार्‍यांच्या सर्वसमावेशक पुनर्वसनासाठी या क्षेत्रात काम करणार्‍या काही स्वयंसेवी संस्था, तज्ज्ञ, राज्यांसोबत एक बैठक १४ जानेवारी २0२0 रोजी आयोजित करण्यात आली होती. मंत्रालयाने चर्चेनंतर, दिल्ली, बंगळुरु, हैदराबाद, इंदूर, लखनौ, नागपूर आणि पाटणा या सात शहरांमध्ये भीक मागण्या संबंधित कामात गुंतलेल्या व्यक्तींच्या सर्वसमावेशक पुनर्वसनावर पथदश्री प्रकल्प सुरू केला.

    हे पथदश्री प्रकल्प राज्य सरकार, केंद्रशासित प्रदेश, स्थानिक स्वराज्य संस्था आणि स्वयंसेवी संस्था इत्यादींच्या सहकार्याने कार्यान्वित केले जात आहेत. सर्वेक्षण आणि नोंद करणे, एकत्रीकरण, पुनर्वसन, वैद्यकीय सुविधांची तरतूद, जागरूकता निर्माण, समुपदेशन, शिक्षण, कौशल्य विकास आणि भीक मागणार्‍या व्यक्तींची शाश्‍वत वस्ती यासह सर्वसमावेशक उपाय याद्वारे प्रदान केले जातात.

    सामाजिक न्याय आणि सशक्तीकरण मंत्रालयाने स्माइल-उपजीविका आणि उपक्रमासाठी उपेक्षित व्यक्तींकरता सहाय्य योजना तयार केली आहे, ज्यात भीक मागणार्‍या व्यक्तींच्या सर्वसमावेशक पुनर्वसनासाठी केंद्रीय क्षेत्र योजना ही उप-योजना समाविष्ट आहे. या योजनेत भीक मागण्यार्‍या व्यक्तींसाठी कल्याणकारी उपायांसह अनेक व्यापक उपायांचा समावेश आहे. पुनर्वसन, वैद्यकीय सुविधांची तरतूद, समुपदेशन, मूलभूत दस्तावेजीकरण, शिक्षण, कौशल्य विकास, आर्थिक संबंध इत्यादींवर या योजनेचा भर आहे.

gauravprakashan1@gmail.com

Maharashtra News, Braking News, Marathi News, Most Popular Marathi News, Latest Marathi News,Today News,Marathi Article, Marathi Poem, Marathi Story,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *