• Sat. Jun 3rd, 2023

बारावीच्या परीक्षा ४ तर दहावीच्या १५ मार्चपासून

    मुंबई : दहावी आणि बारावीच्या परीक्षाबाबतीतील संभ्रम दूर झाला असून त्या नियमित मूल्यमापन पद्धतीने ऑफलाईनच होणार असल्याचे शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले आहे.

    दहावीच्या परीक्षा या १५ मार्च २0२२ ते १८ एप्रिल २0२२ दरम्यान पार पडणार आहेत. त्याचसोबत बारावीच्या लेखी परीक्षा या ४ मार्च ते ७ एप्रिल २0२२ दरम्यान पार पडणार आहेत. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेची सर्व काळजी घेऊन या परीक्षा नियमित पद्धतीने होणार असल्याचे वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केले.इयत्ता १२ वीचा निकाल जून २0२२ च्या दुसर्‍या आठवड्यापयर्ंत आणि इ. १0वीचा निकाल जुलै २0२२ च्या दुसर्‍या आठवड्यापयर्ंत जाहीर करण्याचा आमचा प्रयत्न राहील.

    कोरोना प्रतिबंधक नियमावलीचे काटेकोर पालन करूनच सर्व परीक्षा पार पडतील. तसेच विद्यार्थ्यांचे आरोग्य, सुरक्षितता आमची प्राथमिकता आहे. सुरक्षित व पोषक वातावरण प्रदान करण्यासाठी याअगोदर परीक्षा वेळापत्रक,पद्धतीबद्दल राज्यभरातील शाळा, मुख्याध्यापक, शिक्षक व मूल्यांकनासंदर्भातील तज्ज्ञांसोबत विस्तृत चर्चा करून त्यांच्या मौल्यवान सूचनांचा समावेश करण्यात आला आहे, असे वर्षा गायकवाड यांनी सांगितले. इयत्ता दहावीच्या प्रात्यक्षिक, श्रेणी व तोंडी, अंतर्गत गुणांच्या परीक्षा २५ फेब्रुवारी ते १४ मार्च २0२२ या कालावधीत आयोजित करण्यात येतील. लेखी परीक्षा १५ मार्च ते १८ एप्रिल २0२२ या कालावधीत होतील. तर प्रात्यक्षिक, श्रेणी/ तोंडी व अंतर्गत मूल्यमापन परीक्षा व आऊट ऑफ टर्न परीक्षा ५ एप्रिल ते २५ एप्रिल २0२२ या कालावधीत घेण्यात येतील.

    इयत्ता दहावीसाठी दिव्यांग विद्यार्थ्यांच्या कार्यशिक्षण विषयाची परीक्षा ५ एप्रिल ते १९ एप्रिल २0२२ या कालावधीत होतील. इयत्ता दहावीच्या परीक्षांचा निकाल अंदाजे जुलै २0२२ च्या पहिल्या अथवा दुस?्या आठवड्यात जाहीर होईल. परीक्षांच्या पार्श्‍वभूमीवर कोविड-१९ संदर्भात केंद्र व राज्य शासनाने तसेच आरोग्य विभागाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, अशी सूचना शालेय शिक्षण विभागाने केली आहे.

gauravprakashan1@gmail.com

Maharashtra News, Braking News, Marathi News, Most Popular Marathi News, Latest Marathi News,Today News,Marathi Article, Marathi Poem, Marathi Story,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *