• Wed. Jun 7th, 2023

फँड्रीतल्या शालूला थेट बॉलिवूडचे तिकीट

    पुणे : फँड्री या बहुचर्चित चित्रपटातून घरोघरी पोहचलेली अभिनेत्री रार्जशी खरातला बॉलिवूडचे तिकीट मिळाले आहे. पुणे टू गोवा चित्रपटातून रार्जशी बॉलिवूडमध्ये पदार्पण करत असून या अगोदर रार्जशीनं फँड्री, आयटमगिरी अशा मराठी चित्रपटातून अभिनय केला होता.

    अमोल भगत दिग्दर्शित पुणे टू गोवा या चित्रपटात रार्जशी दिसणार आहे. याचबरोबर आदित्यराजे मराठे देखील बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहेत. या हिंदी चित्रपटाची निर्मिती आदित्यराजे मराठे प्रॉडक्शन आणि मोरया प्रॉडक्शन हाऊस यांनी केली असून हा चित्रपट कॉमेडी, सस्पेन्स, थ्रिलर आणि अँक्शन रसिकांना पाहता येणार आहे.

    कुठे चुकतो आपण?

    सध्याच्या धकाधकीच्या जीवनात ताणतणावांपासून कोणीही सुटत नाही. प्रचंड काम, प्रवास, घराची जबाबदारी यामुळे ताण वाढतोच. शिवाय आपल्या काही सवयींमुळेही ताणात भर पडते. कोणत्या आहेत या सवयी? जाणून घेऊ.

    काही लोक छोट्या छोट्या गोष्टींचा अतिविचार करतात. या अतिविचारामुळे ताणात भर पडते. अतिविचारावर नियंत्रण मिळवता येतं. मनात कोणत्याही चुकीच्या विचारांना थारा देऊ नका. वर्तमानात जगा. भूतकाळ तसंच भविष्याचा फार विचार करू नका.माणसाला शांत झोपेची गरज असते. पुरेशी झोप मिळाली की दिवस उत्साहात सुरू होतो. अपुर्‍या झोपेमुळे मात्र खूप चिडचिड होते. ताण वाढतो. त्यामुळे दररोज किमान सहा ते आठ तासांची झोप घ्यायला हवी. अव्यवस्थितपणामुळेही ताण वाढतो. घरात किंवा ऑफिस डेस्कवर खूप पसारा असेल तर ताणात भर पडते. हा ताण कमी करण्यासाठी प्रत्येक वस्तू जागेवर ठेवा. घर आवरून ठेवा. उगाचच पसारा करू नका.

    स्मार्टफोन हा सुद्धा ताणात भर घालणारा घटक आहे. त्यामुळे स्मार्टफोन, सोशल मीडिया यांचा वापर र्मयादेतच करायला हवा. स्मार्टफोन वापरावर नियंत्रण आणा. गरज वाटल्यास नोटिफिकेशन्स बंद करा. झोपण्याआधी काही काळ स्मार्टफोन बाजूला ठेवा. यामुळे तुमचा ताण कमी व्हायला मदत होईल.

(Images Credit : Sakal)

gauravprakashan1@gmail.com

Maharashtra News, Braking News, Marathi News, Most Popular Marathi News, Latest Marathi News,Today News,Marathi Article, Marathi Poem, Marathi Story,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *