आज झालाय इथे शांत
झुंज देऊन वादळाशी
तो झोपला आहे निवांत
चैत्यभूमीवरी तो निद्रिस्त झाला
दाखवून विकासाच्या वाटा
अंतिम दर्शन घेण्या तयांचे
उसळल्या होत्या समुद्राच्या लाटा
निर्वाणाच्या तयाची समुद्र
लाटांनीही व्यक्त केली खंत
कारण झुंज देऊन वादळाशी
तो झोपला आहे निवांत
ज्ञानाचा तो महासागर
तयाची कुणी न मोजे खोली
आज पूर वाहतोय आसवांचा
तुज वाहतांना पुष्पांजली
महामेरू तो भारताचा
संविधानरुपी आजही भासे जिवंत
पण झुंज देऊन वादळाशी
तो झोपला आहे निवांत
आज शांत झालाय ज्वालामुखी
सारेच मोकळे करून गुलाम
म्हणून नतमस्तक तुझ्या चरणी
तुज करूनी निळा सलाम
शिल्पकार तो देशाचा
नवकोटी लेकराची
तयालाच होती भ्रांत
पण झुंज देऊन वादळाशी
तो झोपलाय आज निवांत
तो झोपलाय आज निवांत
विद्रोही कवी
– रविंद्र सोनाळे गायतोंडकर
रा प महामंडळ रायगड विभाग
*मो9960421715