• Wed. Jun 7th, 2023

पर्यटन सुलभ मार्गदर्शक (गाईड) प्रशिक्षणासाठी 31 डिसेंबर पर्यंत अर्ज सादर करावे

    अमरावती, दि.१3 : स्थानिक प्रसिध्‌द पर्यटन स्थळी पर्यटकांसाठी टूर गाईडची व्यवस्था करुन, या माध्यमातून स्थानिक युवकांना रोजगार मिळवून देण्याच्या उद्देशाने बुलडाणा जिल्ह्यातील लोणार सरोवर व लोणार अभयारण्य या पर्यटन स्थळी सुलभ मार्गदर्शक (ट्रॅव्हल गाईड) प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. सुलभ मार्गदर्शक प्रशिक्षण उपक्रमाच्या अंतर्गत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टुरिझम व ट्रॅव्हल मॅनेजमेंट (Indian Institute of Tourism and Travel Management), ग्वालियर तसेच महाराष्ट्र पर्यटन संचालनालयातील तज्ज्ञ प्रशिक्षणार्थीना मार्गदर्शन करतील. ज्यात स्थानिक पर्यटनाची माहिती, नियम व सुरक्षा उपाययोजना पाळून पर्यटकांचा अनुभव परिपूर्ण कसा करावा तसेच पर्यटकांशी संवाद साधताना आपल्याकडील माहिती गोष्टीरूपाने कशी मांडावी याविषयी सविस्तर प्रशिक्षण दिले जाईल. १८ वर्षे वयापुढील इच्छुक अर्ज सादर करु शकतील. ४० वर्षाच्या आतील वय असलेल्या प्रशिक्षणार्थ्यांनी किमान बारावी व 40 वर्षावरील वय असलेल्या प्रशिक्षणार्थ्यांसाठी दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. 31 डिसेंबर 2021 पर्यत अर्जदारांनी आपले अर्ज पर्यटन विभागाच्या संकेतस्थळावर सादर करावे.

    प्रशिक्षणाअंतर्गत स्थानिक पर्यटन स्थळांच्या ठिकाणी तज्ञ प्रशिक्षक प्रात्यक्षिक आणि मार्गदर्शन करतील. पाच दिवसांचा प्रशिक्षण कालावधी पूर्ण केल्यावर प्रशिक्षणार्थीना महाराष्ट्र पर्यटन संचालनालयातर्फे प्रमाणपत्र व पुढे टूर गाईड म्हणून काम करण्यासाठी ओळखपत्र देण्यात येईल.

    आपल्या फिरस्तीची आवड एका स्थिर करिअरमध्ये बदलण्यासाठी सुलभ मार्गदर्शक प्रशिक्षण उपक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन महाराष्ट्र पर्यटन संचालनालयातर्फे करण्यात आले आहे. महाराष्ट्र पर्यटन विभागाच्या https://www.maharashtratourism.gov.in/web/mh-tourism/certified-guide-training या संकेतस्थळावर ३१ डिसेंबर २०२१ पूर्वी अर्ज करावे. अधिक माहिती www.maharashtratourism.gov.in या संकेतस्थळावर उपलबध्‍ असल्याचे पर्यटन संचालनालयाचे उपसंचालक (पर्यटन) विवेकांनद काळकर, अमरावती यांनी कळविले आहे.

gauravprakashan1@gmail.com

Maharashtra News, Braking News, Marathi News, Most Popular Marathi News, Latest Marathi News,Today News,Marathi Article, Marathi Poem, Marathi Story,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *