• Sat. Jun 3rd, 2023

दातावर घाला दागिने..!

  हल्ली कशाकशाची फॅशन निघेल हे सांगणे कठीन आहे. आता दाताचेच घ्याना. आजकाल दातांवर फॅशन म्हणून वेगवेगळे प्रयोग करण्यात येत आहेत. दात चांगले, चमकदार स्वच्छ दिसावे याकरीता दातांवर कव्हरींग करण्यासाठी जो धातू निवडता आहात, तशा पद्धतीने तुम्हाला यासाठी पैसे मोजावे लागतात.

  आता जर कोणी हसल्यावर तुम्हाला त्याचे दात चमकताना दिसले, तर त्याचे दात किती स्वच्छ, चमकदार असं म्हणून आश्‍चर्यचकीत होऊ नका. कारण ही चमक त्याच्या दातांची नसून त्याच्या दातांवर बसविलेल्या दागिन्यांची असू शकते. हो.. हे खरं आहे. आता जसे तुम्ही कानात, गळ्यात, नाकात दागिने घालता ना, तसेच आता तुमच्या दातांवरही तुम्ही दागिने घालू शकता. दातांसाठी खूप वेगवेगळे दागिने असून या दागिन्यांची फॅशन करणार्‍यांचीही काही कमी नाही.

  १. दातांवर हिरे..

  दातांवर हिरे लावण्याची फॅशन विदेशात अतिशय लोकप्रिय आहे. डेंटिस्ट आणि आर्टिस्ट या दोघांच्या मदतीने दांतांवर अशाप्रकारची कलाकुसर केली जाते. यामध्ये आपण ज्या दाताला मराठीत सुळे म्हणतो त्या दोन मोठ्या दातांपैकी एका दातावर हिरा किंवा अमेरिकन डायमंड लावण्यात येतो. छोटीशी सर्जरी आणि ड्रिल करून हा हिरा दातांवर पक्का बसविण्यात येतो. यासाठी लाखो रुपए लागतात.

  २. दातांवर कव्हर.

  दातांवर हिरा किंवा स्टोन लावण्यापेक्षा ही स्टाईल तुलनेने कमी खर्चात होते. हा उपाय करण्यासाठी दातांवर सगळ्यात आधी सोने, चांदी, प्लॅटिनम हे धातू लावून कव्हरींग केले जाते. त्यानंतर या कव्हरवर काही वर्क करायचे असल्यास करता येते. तुम्ही कव्हरींग करण्यासाठी जो धातू निवडता आहात, तशा पद्धतीने तुम्हाला यासाठी पैसे मोजावे लागतात.

  ३. दातांवर टॅटू

  टॅटू बनविणे हे काही आता आपल्याला नविन राहिलेले नाही. ज्याप्रमाणे आपण शरीराच्या कोणत्याही भागावर टॅटू काढू शकतो, त्याचप्रमाणे आपल्याला दातांवर टॅटू काढता येतो. हा उपाय वरच्या दोन्ही उपायांपेक्षा कमी खर्चात होणारा आहे. यासाठी अनेक जण एकाआड एक दांतांची निवडही करतात. सगळ्यात समोरच्या दोन दातांपेक्षा सुळ्यांवर हे काम जास्त करण्यात येते. तसेच अधिक स्पष्ट आणि उठून दिसण्यासाठी खालच्या दातांपेक्षा वरच्या दातांवरच दागिने लावता येतात.

gauravprakashan1@gmail.com

Maharashtra News, Braking News, Marathi News, Most Popular Marathi News, Latest Marathi News,Today News,Marathi Article, Marathi Poem, Marathi Story,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *