- थांब रे पावसा, आकाशी ढगात
- थांब रे पावसा,थांब…..
- तुडुंब नद्या नाले वाहिले रे
- तळी सारी तुडुंब भरली रे
- पिकं झाली पिवळी,
- गेला त्यांचा बळी
- खूप सोसला तुझा मार
- थांब रे पावसा, आकाशी ढगात
- थांब रे पावसा,थांब…..
- शेतं सारी तळी बनली रे
- पिकांची मुळं कुजली रे
- किती पडला अति,
- केली आमची माती
- झाले नुकसान हे अपार
- थांब रे पावसा, आकाशी ढगात
- थांब रे पावसा,थांब…..
- घर,गुर सारी वाहिली रे
- तुझी अवकृपा पाहिली रे
- बस झाला थाट,
- लावली सारी वाट
- नको नकोशी झाली तुझी धार
- थांब रे पावसा, आकाशी ढगात
- थांब रे पावसा,थांब…..
- धो धो अती तू पडला रे
- शेतकऱ्यांशी खूपच नडला रे
- बस कर आता,
- शांत ठेव माथा
- हो इथून तू हद्दपार
- थांब रे पावसा, आकाशी ढगात
- थांब रे पावसा,थांब…..
- -श्री.युवराज गोवर्धन जगताप
- काटेगाव ता.बार्शी
- जिल्हा सोलापूर
- 8275171227
- (ग.दि.माडगूळकर यांची माफी मागून नाच रे मोरा चे विडंबन काव्य)