• Sat. Jun 3rd, 2023

तोच यशस्वी

    ध्येयाकडे लक्ष । राही सदा दक्ष ।
    संपवितो यक्ष । मार्गतले ।।
    संकटावर चाल। सातत्याची ढाल ।
    विसरतो काल । तोचि पुढे ।।
    स्व बळ विश्वास । जाणतो जो खास।
    मिळे तया घास। यश रुपी ।।
    ध्येय मोठे उरी। प्रयत्न जो करी।
    यश त्याच्या दारी।भरी पाणी।।
    उडतो आकाशी।पाय जमिनीशी ।
    नाळ रे कष्टाशी । तो यशस्वी ।।
    सोशी खूप हाल ।चालू ठेवी चाल ।
    विजयाची शाल । तया अंगी ।।
    युवाचे सांगणे । सातत्य ठेवणे ।
    उद्दिष्ट गाठणे ।तुम्हा हाती।।
    -युवराज गोवर्धन जगताप
    काटेगाव ता. बार्शी
    जिल्हा सोलापूर
    8275171227

gauravprakashan1@gmail.com

Maharashtra News, Braking News, Marathi News, Most Popular Marathi News, Latest Marathi News,Today News,Marathi Article, Marathi Poem, Marathi Story,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *