• Thu. Sep 28th, 2023

तारक मेहता : ‘जेठालाल’ दिलीप जोशी सोडणार मालिका?

    मुंबई : तारक मेहता का उल्टा चश्मा, एक अशी कौटुंबिक मालिका आहे. दीर्घकाळ सुरू असलेली ही मालिका लकप्रिय ठरलीय. ही १३ वर्षे जुनी मालिका आहे.

    Thank you for reading this post, don't forget to subscribe!

    केवळ मालिकाचे नाही तर लोकांनी खूप सारं प्रेम यातील कलाकारांनाही दिलंय. ‘जेठालाल’, ‘टप्पू, यासारख्या भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्यात. हेच कारण आहे की, जेव्हा ‘दयाबेन’ म्हणजेच दिशा वकानी या मालिकेतून बाहेर गेली. तेव्हा सर्वांना धक्का बसला. मागील काही काळात या मालिकेत काही बदल पाहायला मिळताहेत. दरम्यान, या टीव्ही मालिकेतून कलाकार ‘टप्पू’ची भूमिका साकारणारा राज अनादकट मालिकेला अलविदा म्हणणार आहे, असे वृत्त येऊन धडकले होते. आत जेठालाल दिलीप जोशी मालिका सोडणार असल्याचे समजतेय. एका मुलाखतीत दिलेल्या वृत्तानुसार, जेव्हा शो सोडण्यासाठी प्रश्न विचारण्यात आला तेव्हा दिलीप म्हणाले, माझा शो एक कॉमेडी मालिका आहे. याचा एक भाग होणं खूप मजेशीर आहे. यासाठी मी एन्जॉय करत आहे. तोपयर्ंत मी हा अभिनय करेन.

    ज्यादिवशी मला अनुभव होईल की, मी या मालिकेचा आनंद घेत नाहीये, त्यादिवशी मी पुढे जाईन. दिलीप जोशी यांनी हा देखील खुलासा केला ती, त्यांना काही अन्य शोच्या नव्या ऑफर मिळताहेत. पण, ते या शोसाठी ती ऑफर स्वीकारत नाहीत. मला वाटतं की, जर हा शो चांगला सुरू आहे तर अन्य गोष्टींसाठी अनावश्यक असताना मालिका का सोडायची? हा एक सुंदर प्रवास आहे. यासाठी मी खूप खुश आहे. लोक आमच्यावर खूप प्रेम करतात. जेठालालच्या भूमिकेने प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडलीय. त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये काम केलंय. त्यांनी ‘मैंने प्यार किया’ आणि ‘हमराज’ यासारख्या चित्रपटांमध्ये छोटी भूमिका साकारली होती. आतादेखील ते चित्रपटांमध्ये काम करायला तयार आहेत. ते म्हणाले, मला अभिनयात खूप काही करायचं आहे. जीवन अद्यापही बाकी आहे. मला जर चांगली ऑफर मिळाली तर मी चांगला चित्रपट सोडणार नाही. आता ते माझ्या आयुष्यात घडत आहे. ते मी एन्जॉय करतेय.

gauravprakashan1@gmail.com

Maharashtra News, Braking News, Marathi News, Most Popular Marathi News, Latest Marathi News,Today News,Marathi Article, Marathi Poem, Marathi Story,