प्रज्ञावंत त्यागी घटनाकारांना॥धृ॥
अठरा एकवीस तास अभ्यास॥
ग्रंथ वाचनाचा एक निजध्यास॥
गुणवंत-प्रज्ञावंत शास्राभ्यास॥
बाबासाहेब ज्ञानाचा खजिना॥१॥
लेखनी बाबांची खूप धारदार॥
संविधानाचे एक शिल्पकार॥
डाँक्टर भीमराव आंबेडकर॥
तव सत्कार्याची करु या गर्जना॥२॥
स्वातंत्र्य,समता,बंधुता नि न्याय॥
घटनेने बहुजन अभ्युदय॥
सर्व क्षेत्री कर्म नम्र सविनय ॥
बाबांच्या कार्याला ही मानवंदना॥३
–प्रा.अरुण बाबारावजी बुंदेले,
रुक्मिणी नगर ,अमरावती.
भ्र.ध्व.८०८७७४८६०९