- चालून चालून थकून गेली वाट…
- पण अजून माझा सरला नाही थाट…
- माझ्या मनाला मीच समजावत असतो….
- नाहीतरी आपलंही आपण नसतो…
- कसेही करून मीच चांगला , हे सिद्ध करतो…
- कसेही करून माझेच भांडे भरून घेतो..
- कशाला ही मी आता चांगले समजत नाही…
- मला चांगले म्हणजे काय हेच समजत नाही…
- असाच जगण्याचा खेळ सुरू आहे….
- धावणे ,पळणे,थकने उठणे नित्य सुरू आहे…
- कसलाच भाव मनात,चेहऱ्यावर आता उमटत नाही….
- जगणे म्हणजे काय हेच आता समजत नाही…
- माणूस जगतो म्हणजे काय करतो हेच कळत नाही…
- माणूस माणूस आहे की एक साधा जीव हेच उमगत नाही..
- कसेही,,कधीही,,काहीही करून जगणे,,म्हणजेच जगणे होय का.?
- पोट भरण्यासाठी जगणे म्हणजे जगणे होय का….?
- -निलेश रामभाऊ मोरे
- मु.पोस्ट. मनभा
- तालुका कारंजा जिल्हा वाशिम