• Fri. Jun 9th, 2023

जिल्ह्यातील सर्व न्यायालयात शनिवारी राष्ट्रीय लोकअदालत

    अमरावती :अमरावतीसह सर्व न्यायालयात शनिवारी (11 डिसेंबर) राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणाच्या सूचनेनुसार राष्ट्रीय लोकअदालत होणार असून, त्यात दाखल व दाखलपूर्व अशी प्रकरणे तडजोडीने व सामंजस्याने निकाली काढण्यासाठी ठेवण्यात येणार आहेत.

    त्यातील सहभागासाठी कोणत्याही प्रकारचे अतिरिक्त शुल्क भरावे लागणार नाही. संबंधितांनी तडजोडप्राप्त प्रलंबित खटले तडजोडीने व सामंजस्याने मिटविण्यासाठी संबंधित न्यायालयात अर्ज करावा, तसेच दाखलपूर्व प्रकरणांबाबत नजिकच्या संबंधित जिल्हा किंवा तालुका न्यायालय यांच्याकडे संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

    राष्ट्रीय लोक अदालतीसमक्ष प्रकरणे सामंजस्याने व तडजोडीने मिटवावेत असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरण अमरावती चे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. एम. जोशी तसेच सचिव जी. आर. पाटील यांनी केले आहे.

(Images Credit : Patrica)

gauravprakashan1@gmail.com

Maharashtra News, Braking News, Marathi News, Most Popular Marathi News, Latest Marathi News,Today News,Marathi Article, Marathi Poem, Marathi Story,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *