• Sun. May 28th, 2023

छंदांना व्यवसायाची जोड..!

    अनेक महिलांमध्ये उपजत कला-गुण आढळतात. अनेक महिलांना चित्रकला, हस्तकला, मूर्तीकला आवडते. डिझायनिंग, अँनिमेशन, गेमिंगमध्येही त्यांना रस असतो. पण या छंदांना, कलागुणांना विविध अभ्यासक्रमांच्या माध्यमातून वाव देता येतो. हे अभ्यासक्रम पूर्ण करून छंद, आवडींना व्यवसायाची जोड देऊ शकता.

    चित्रकला, हस्तकला, डिझायनिंगसारख्या कलांना फाईन आर्टस म्हटलं जातं. यात बॅचलर, मास्टर्स किंवा पीएचडी करता येते. सोबत वर्षभराचे डिप्लोमा अभ्यासक्रम उपलब्ध आहेत.

      बॅचलर इन फाईन आर्टस साठी चार वषर्ं द्यावी लागतात. दोन वर्षाचा मास्टर्स अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर फाईन आर्टसमध्ये पीएचडी करता येते. दूरस्थ शिक्षण पद्धतीनेही फाईन आर्टची पदवी मिळवता येते. अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर अनेक संधी प्राप्त होतात. इतर क्षेत्रांमध्ये नोकरी करणार्‍या महिला फ्री लान्सर म्हणून काम करू शकतात.

    आपल्या कलाकृतींचं प्रदर्शन भरवू शकतात. जाहिरात कंपन्या, एजन्सी, आर्ट स्टुडिओमध्ये नोकरी मळू शकते. क्रिएटिव्ह डायरेक्टर, आर्ट डायरेक्टर, २डी/थ्रीडी आर्टस्ट, क्रिएटव्ह डिझायनर, ग्राफिक डिझायनर, क्राफ्ट आर्टस्ट म्हणूनही तुम्ही काम करू शकता.

gauravprakashan1@gmail.com

Maharashtra News, Braking News, Marathi News, Most Popular Marathi News, Latest Marathi News,Today News,Marathi Article, Marathi Poem, Marathi Story,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *