• Mon. Jun 5th, 2023

ग्राहक पंचायत महाराष्ट्र दिनदर्शिकेचा प्रकाशन सोहळा थाटात संपन्न

*अभिनव सोहळ्याचे राज्य अध्यक्ष विजय लाड तर्फे कौतुक*

*प्रा. डॉ. अंबादास मोहिते यांची ग्राहक पंचायतच्या विभागीय अध्यक्ष पदावर निवड*
*अमरावती*:- प्रतिनिधी
येथील ग्राहक पंचायत महाराष्ट्र जिल्हा शाखा, अमरावतीच्या वतीने नूतनवर्ष 2022 दिनदर्शिकेचा प्रकाशन सोहळा स्थानिक पूजा कॉलिनी मधील नरहरी मंगल कार्यालयात नुकताच उपस्थित अतिथीच्या हस्ते थाटात संपन्न झाला.
व्यासपिठावरील सर्व अतिथी व मान्यवरांचे पुष्पगुष्य देऊन फटाकेच्या जल्लोषात स्वागत करण्यात आले. दीप प्रज्वलन झाल्यावर स्वागतगित कविता बनसोड तर ग्राहक गित गौरव गजभिये यांनी सादर केले.
व्यासपिठावर उपस्थित सर्व मान्यवर अतिथिंचा शाल व श्रीफळ देऊन यथोचित सत्कार आयोजकांनी केला.
उदघाटकीय भाषणातून किरण पातूरकर यांनी देशातील प्रत्येक नागरिकांना ग्राहक पंचायतची गरज असल्याचे मत व्यक्त केले. तसेच ग्राहक पंचायत महाराष्ट्र अमरावतीच्या विभागीय अध्यक्ष पदावर येथील यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापिठाचे विभागीय संचालक प्रा. डॉ. अंबादास मोहिते यांची निवड करण्यात आली. या निमित्त त्यांचा सत्कार उदघाटक किरण पातूरकर यांचे हस्ते करण्यात आला. स्वागताध्यक्ष चेतन पवार यांनी ग्राहक पंचायतचे पदाधिकारी व सदस्य यांना कार्यशाळा आयोजित करून प्रशिक्षण देण्याची नितांत आवश्यकता असल्याचे प्रतिपादन केले. ग्राहकांच्या विविध समस्या संघटितपणे सोडवून त्यांचे सोबत विश्वासनियता प्रस्तापित करण्याचा सल्ला विदर्भ प्रांत अध्यक्ष श्यामकांत पात्रिकर यांनी मार्गदर्शन करतांना दिला. विदर्भ संघटक डॉ. कल्पनाताई उपाध्याय यांनी ग्राहकांच्या नैतिक चौकटीत राहून सेवा प्रदान करणे, उल्लेखनीय कामांच्या नोंदी ठेवणे, शासकीय अधिकारी यांचेशी समनव्य ठेवण्याबाबत निर्देशीत केले. वस्तू खरेदी करतांना खोट्या व फसव्या जाहिराती पासून सतर्क, सजग राहण्याचे आवाहन प्रा.डॉ. अंबादास मोहिते यांनी मनोगता मधून केले.संघटनेचे राज्य अध्यक्ष डॉ.विजय लाड यांनी अध्यक्षीय मनोगता मधून ग्राहक पंचायतच्या दिनदर्शिके मध्ये श्रमिक, उद्योजक, व्यापारी, शेतकरी, ग्राहक या पाच तत्वाचा समावेश असल्यामुळे हे कॅलेंडर नसून ग्राहकांसाठी पंचाग असल्याचे सांगितले. तसेच या अभिनव सोहळ्याचे कौतुक करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्यात.
प्रकाशन सोहळ्याचे प्रास्ताविक जिल्हा अध्यक्ष गजानन मुदगल यांनी केले.संचालन प्रा. प्रमोद मेश्राम तर उपस्थितांचे आभार संघटनेचे जिल्हा विधी सल्लागार ऍड. प्रभाकर वानखडे यांनी मानले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जिल्हा उपाध्यक्ष निलेश घोंगडे, सचिव रवींद्र डकरे, विधी सल्लागार ऍड. प्रभाकर वानखडे, प्रजावती गावंडे, विद्याताई पवार, बापूराव तालन, युवराज गजभिये, अलका घोडेस्वार, रेखा वर्दे, माधुरी देशमुख, कमलदास पांडेकर , विकास मेटांगे, संजय अग्रवाल, विद्या पवार, माया तोटेवार, अरुणा सुरवाडे, शिवाजी अब्रूक, ज्योती महल्ले, रजनी पाचंगे, सतीश ढेपे, शिल्पा भामोदे,विजय अनासने, फेहमूद खान, अब्दुल कलाम, सुशील इंगळे, अजय राठोड,रोशन शिरसाठ, आदींनी अथक परिश्रम घेतले. राहुल माने यांनी पसायदान सादर करून स्नेह भोजनाने कार्यक्रमाची सांगता झाली.

gauravprakashan1@gmail.com

Maharashtra News, Braking News, Marathi News, Most Popular Marathi News, Latest Marathi News,Today News,Marathi Article, Marathi Poem, Marathi Story,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *