• Mon. May 29th, 2023

खेड येथे ग्रामीण भागातल्या समस्या सोडवण्यासाठी ‘आमदार आपल्या दारी’ !

  * आमदार देवेंद्र भुयार यांनी सर्व विभागाचे अधिकारी गावात नेऊन सोडवल्या नागरिकांच्या समस्या !
  * आमदार आपल्या दारी उपक्रमातुन शेकडो तक्रारींचा निपटारा !

  मोर्शी :मोर्शी विधानसभा मतदारसंघाचे आमदार देवेंद्र भुयार कायमच जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी कटिबद्ध असल्याचे पाहायला मिळत आहे व आजही शहरी असो अथवा ग्रामीण प्रत्येक नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी आमदार देवेंद्र भुयार हे कायमच जनतेत पाहायला मिळतात.

  आमदार देवेंद्र भुयार यांच्या संकल्पनेतून मोर्शी तालुक्यातील विविध गावांत आमदार आपल्या दारी अभिनव उपक्रम राबविण्यात येत असून, खेड येथे आयोजित आमदार आपल्या दारी उपक्रमाचा खेड, वरला, उदखेड, कोळविहिर, तरोडा, रायपूर, डोमक, आष्टोली, येथील ग्रामस्थांनी लाभ घेतला. या उपक्रमाच्या माध्यमातून गावातील नागरिकांच्या महावितरण, ग्राम विकास व महसूल विभागाचे संबंधित असलेल्या सर्व अडचणी कशा सोडवता येतील यासाठी आमदार स्वतः सरसावले असल्याचे दिसून येते.

  प्रामुख्याने ग्रामीण भागातील वृद्ध नागरिकांच्या संजय गांधी निराधार योजना व श्रावण बाळ योजनेच्या अडचणी मागील अनेक वर्षांपासून प्रलंबित होत्या. या सर्व अडचणी आता काही क्षणातच मार्गी लागत आहेत आणि यामुळे निराधारांना दिलासा मिळत आहे . जनतेला केंद्रबिंदू म्हणून आमदार देवेंद्र भुयार यांनी हिची नवीन मोहीम हाती घेतली आहे त्या मोहिमेमुळे आता अनेक वर्षांपासून रखडलेले प्रश्न तात्काळ मार्गी लागत आहेत. लवकरच मोर्शी विधानसभा मतदारसंघातील जिल्हा परिषद गट आणि गण निहाय सर्व गावांना आमदार स्वतः भेटी देऊन त्यांचे प्रश्न गावात बसूनच मार्गी लावणार असून आता छोट्या छोट्या कामांसाठी वृद्ध नागरिकांना शहरात येण्याची आवश्यकता भासणार नाही. आणि हेच या मोहिमे मागची भावना असल्याचे आमदार देवेंद्र भुयार यांनी यावेळी सांगितले.

  या अभिनव उपक्रमाला मोर्शी विधानसभा मतदार संघाचे आमदार देवेंद्र भुयार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष नरेंद्र जिचकार, सरपंच कल्याणी राजस, तहसीलदार कृष्णकुमार ठाकरे, गट विकास अधिकारी रवींद्र पवार, ठाणेदार मोहंदूळे, उदखेड सरपंच धनराज राठोड, भूमी अभिलेख अधिकारी सोनारे, मोहन राजस, सुनील देशमुख, अमित देशमुख, विवेक देशमुख, हितेश साबळे, रुपेश वाळके, विपुल हिवसे, रमाकांत कोंडे, पंकज हरले, अमोल कडू, संदीप अढाऊ, मधुकर अढाऊ, कमलदास इंगळे, प्रफुल चिखले, मंगेश इंगोले, सुरज शहाणे, मुरली अढाऊ, पिंटू बोबडे, प्रवीण कोंडे, नकुल अढाऊ, प्रीतम राजस, सुनील लुंगे, स्वराज तट्टे, रामदास चांगोले, अरुण झटाले, सुभाष रडके, शेर खान, आशिष लुंगे, यांच्यासह शासकीय विभागांचे अधिकारी व कर्मचारी ,पदाधिकारी उपस्थित होते.

  या अभियानामध्ये श्रावणबाळ, संजय गांधी निराधार योजना, महसूल विभाग, सामाजिक वनीकरण विभाग, कृषी, महिला व बालकल्याण विभाग, भूमी अभिलेख विभाग, आरोग्य विभाग, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, समाजकल्याण, सिंचन, लघु पाटबंधारे, महावितरण, पुरवठा, पशुसंवर्धन, आरोग्य, कामगार कल्याण, परिवहन विभाग, आदी विविध विभागांच्या दालनातून नागरिकांना योजनांची माहिती देण्यात आली व त्यांच्या समस्यांचे निराकरण करण्यात आले.

  आमदार आपल्या दारी उपक्रमाच्या ठिकाणी नागरिकांना त्यांचा अर्ज दाखल करण्यासाठी लेखन कक्ष, अर्जवाटप कक्षाची सुविधा सह आदी सुविधाही उपलब्ध करून देण्यात आल्या. दिव्यांग नागरिक, महिला, ज्येष्ठ नागरिक, युवक, युवती आदी शेकडो नागरिकांनी उपक्रमाचा लाभ घेतला. आधारकार्ड, जेष्ठ नागरिक स्मार्ट कार्ड, पोखरा अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या योजना,यासह विविध विभागाचे अर्ज स्वीकारण्यासाठी स्वतंत्र कक्ष उपलब्ध करून देण्यात आले होते.

gauravprakashan1@gmail.com

Maharashtra News, Braking News, Marathi News, Most Popular Marathi News, Latest Marathi News,Today News,Marathi Article, Marathi Poem, Marathi Story,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *