कर्ज परतफेड करणार्‍या शेतकर्‍यांना सानुग्रह अनुदान

    मुंबई : राज्य सरकारने महात्मा ज्योतिबा फुले कर्ज माफी योजना अंतर्गत नियमित कर्ज परतफेड करणार्‍या शेतकर्‍यांना सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय घेतला होता. कोरोना महामारीमुळे यात खंड पडला असला तरी या शेतकर्‍यांना ५0 हजार रुपयांचा परतावा दिला जाईल, अशी घोषणा अर्थमंत्री अजित पवारयांनी विधानसभेत केली.

    Thank you for reading this post, don't forget to subscribe!

    महात्मा ज्योतिबा फुले कर्ज माफी योजना अंतर्गत राज्यातील दोन लाखांपर्यंत कर्ज कसलेल्या शेतकर्‍यांना कर्जमाफी देण्यात आली होती. तर ज्या शेतकर्‍यांनी नियमित पीक कर्जांची परतफेड केली आहे, अशा शेतकर्‍यांना ५0 हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णयही सरकारने जाहीर केला होता. मात्र कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे आर्थिक अडचणी निर्माण झाल्या. त्यामुळे या शेतकर्‍यांना परतावा देता आला नव्हता.

    मात्र अशा सर्व शेतकर्‍यांना ५0 हजार रुपये परतावा निश्‍चित देण्यात येईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी सभागृहात दिली. शिवसेना आमदार प्रकाश आबिटकर यांनी यासंदर्भातील प्रश्न सभागृहात उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना अजित पवार यांनी सांगितले, की शेतकर्‍यांना तीन लाखपयर्ंत पिक कर्ज शून्य टक्के व्याजदराने देण्याचा सरकारचा विचार असून त्यासंदर्भात लवकरच कार्यवाही केली जाईल, नियमित कर्जफेड करणार्‍या शेतकर्‍यांना यात प्राधान्य दिले जाईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.