मुंबई : एसटी महामंडळाचे विलिनीकरण करण्याच्या मागणीवर कर्मचारी ठाम आहेत. मात्र दुसरीकडे महामंडळाकडून आतापयर्ंत २५७ कर्मचार्यांना बडतर्फीची कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. त्याला उत्तर न देणार्या ११ कर्मचार्यांना बडतर्फ करण्यात आले आहे, अशी माहिती एसटी महामंडळाने दिली.
- १0,४५१ कर्मचारी निलंबित
महामंडळाने दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी २७ एसटी कर्मचार्यांवर बडतर्फीची कारवाई करण्याच्या दृष्टीने कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली. त्यामुळे नोटीस बजावण्यात आलेल्या कर्मचार्यांची संख्या २५७ झाली आहे. एसटीतील १११ कर्मचार्यांना बुधवारी निलंबित करण्यात आले. त्यामुळे निलंबित केलेल्या कर्मचार्यांची संख्या एकूण १0,४५१ वर पोचली आहे.
नियमानुसार, निलंबित केलेल्या कर्मचार्यांना प्रथम पंधरा दिवसांत म्हणणे मांडण्याची संधी दिली जाते. त्यानंतर तीन वेळा सुनावणीसाठीही हजर राहण्याच्या सूचना असतात. त्यालाही प्रतिसाद न दिल्यास बडतफीर्ची कारवाई करण्याच्या दृष्टीने कारणे दाखवा नोटीस बजावली जाते. त्यानुसार आतापयर्ंत रोजंदारीवरील २,0४३ कर्मचार्यांचीही सेवा समाप्ती केली आहे दरम्यान, विलिनीकरणाच्या मागणीसाठी सुरू असलेल्या संपात सामिल असलेल्यांच्या गैरसोयीच्या ठिकाणीही बदल्या केल्या जात आहेत. बुधवारी ५२ कर्मचार्यांच्या गैरसोयीच्या ठिकाणी बदल्या करण्यात आल्या. एकूण २,६२४ कर्मचार्यांच्या बदल्या केल्या असल्याचीही माहिती मिळत आहे.