• Sun. May 28th, 2023

आराध्या बच्चनची ती भविष्यवाणी ऐकून बच्चन कुटुंबियांना बसला होता धक्का

    मुंबई- बॉलिवूड अभिनेत्री ऐश्‍वर्या राय बच्चन आणि पती अभिषेक बच्चन यांची जोडी ही लोकप्रिय जोड्यांपैकी एक आहे. ऐश्‍वर्या आणि अभिषेक यांना एक मुलगी असून तिचं नावं आराध्या आहे.

    बर्‍याचवेळा काही चाहते बच्चन कुटुंबा विषयी भविष्यवाणी करताना दिसतात. दरम्यान, अशीच एक भविष्यवाणी आराध्याविषयी केली होती. ही भविष्यवाणी ऐकल्यानंतर फक्त बच्चन कुटुंब नाही तर संपूर्ण देशालाही धक्का बसला होता. आराध्या ही आता १0 वर्षांची झाली आहे. जेव्हा आराध्याचा जन्म झाला होता तेव्हा तिच्या विषयी एक ज्योतिषीने भविष्यवाणी केली होती.

    त्या ज्योतिषीच्या म्हणण्याप्रमाणे आराध्या बॉलिवूडमध्ये नाही तर राजकारणात जाणार आणि एवढचं नाही तर ती देशाची प्रधानमंत्री होणार. ज्योतिष डी ज्ञानेश्‍वर यांनी दिलेल्या माहितीनुसार आराध्या ही मोठी झाल्यावर राजकारणात जाणार, एवढचं नाही तर तिचं उज्वल भविष्य आहे. हे तेच ज्योतिष आहेत. ज्यांनी रजणीकांत आणि कमल हसन राजकारणात जाणार असल्याची भविष्यवाणी केली होती. यासोबत त्यांनी नरेंद्र मोदी भारताचे पंतप्रधान होणार असल्याची भविष्यवाणी केली होती. आता आराध्या विषयी केलेली ही भविष्यवाणी खरी ठरणार की नाही हे तर आपल्याला कळेलच.

gauravprakashan1@gmail.com

Maharashtra News, Braking News, Marathi News, Most Popular Marathi News, Latest Marathi News,Today News,Marathi Article, Marathi Poem, Marathi Story,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *