• Mon. Jun 5th, 2023

आन बळीचं शासन…

    बाया वऱ्हाड मातीले
    लावे कपायाले जवा ।
    दिसे चंडिकाचं रूप
    मले त्याईच्यात तवा ।।
    आज ईंग्रजी शिकून
    पोरी पोरं बिघडले ।
    विटीदांडू, लगोरिले
    हाये सगये भुलले ।।
    लुडो, पब्जी खेयासाठी
    पोरं वेडावून गेले ।
    आज वऱ्हाडचे पोरं
    झाले ईंग्रजांचे चेले ।।
    कायी माती वाटे घान
    ट्याटू अंगाले पाह्यजे ।
    शतपद चालायले
    बूट पायाले पाह्यजे ।।
    थोबाडात सुका खर्रा
    दात झाले कायेभोर ।
    दारु रोज सोता पिते
    लावे दुसऱ्याले घोर ।।
    कोन गरीब, सिर्मंत
    इथं कोनाले कयते? ।
    रोज सकायी सकायी
    बघा दोघंई पयते ।।
    पांडुरंगा मायबापा
    आन बळीचं शासन ।
    साडी, कुंकवात हाये
    आया बैनीचे रक्षन ।।
    -अजय रमेश चव्हाण,
    तरनोळी
    ता.दारव्हा, जि.यवतमाळ
    मो.८८०५८३६२०७

gauravprakashan1@gmail.com

Maharashtra News, Braking News, Marathi News, Most Popular Marathi News, Latest Marathi News,Today News,Marathi Article, Marathi Poem, Marathi Story,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *