• Sun. Jun 4th, 2023

अखेर नांदगावपेठ -पांढुर्णा राष्ट्रीय महामार्गाच्या उखडलेल्या रस्त्याच्या कामाला सुरुवात !

    नांदगावपेठ- पांढुर्णा राष्ट्रीय महामार्गाला दोन वर्षातच पडल्या भेगा !
    रुपेश वाळके यांच्या मागणीची घेतली दखल !

    मोर्शी : रस्ते व वाहतूक मंत्री म्हणून धुरा सांभाळनारे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून देशभरात महामार्गाची भरमसाठ कामे करण्यात आली असून त्यामध्ये नांदगावपेठ – पांढुर्णा महामार्गाकरिता ५३० कोटी रुपये उपलब्ध करून या रस्त्याचे काम करण्यात आले मात्र ठेकेदाराच्या व संबंधित राष्ट्रीय बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे महामार्गाचे काम निकृष्ठ दर्जाचे होऊन रस्त्याला भेगा पडल्यामुळे महामार्गावरील रस्त्याला खड्डे पडत आहे या निकृष्ट झालेल्या कामाची चौकशी करून कंत्राटदार व दोषी अधिकाऱ्यांवर कार्यवाही करून महामार्गाला पडलेल्या भेगांचे पॅनल उखडून पुन्हा नव्याने तयार करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका उपाध्यक्ष रुपेश वाळके यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली होती.

    अमरावती जिल्ह्यातील नांदगावपेठ ते पांढुर्णा पर्यंत नव्याने निर्माण करण्यात आलेल्या ९६ किलोमीटरच्या सिमेंट रस्त्याच्या राष्ट्रीय महामार्गाला अवघ्या दीड ते दोन वर्षामध्येच अनेक ठिकाणी भेगा गेल्यामुळे नांदगावपेठ – पांढुरणा महामार्गाच्या कामातील दर्जावर महाराष्ट्र व मध्यप्रदेश येथील वाहन चालक व नागरिकांकडून प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहे. या राष्ट्रीय महामार्गावर शेकडो पॅनलला भेगा पडल्या असल्यामुळे महामार्गावरील रोड खराब होत असल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका उपाध्यक्ष रुपेश वाळके यांच्या मागणीची दखल घेऊन संबंधीत कंत्राटदार व राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभाग खडबडून जागा झाल्यामुळे राष्ट्रीय महामार्गावर सिमेंट रोडला पडलेल्या भेगांचे पॅनल उखडून पुन्हा नव्याने तयार करण्याचे काम सुरू झाल्याचे दिसत आहे.

    नांदगाव पेठ ते मध्यप्रदेशातील पांढुर्णा पर्यंत असलेल्या ९६ किलोमीटरच्या या राष्ट्रीय महामार्गात दोन टप्पे आहे. पहिला टप्पा नांदगाव पेठ ते मोर्शी हा ४३ किलोमीटर लांबीचा टप्पा असून यासाठी शासनाने तब्बल २४० कोटी रुपये खर्च करण्यात आले तसेच दुसरा टप्पा हा मोर्शी ते पांढुरणा पर्यंत आहे या ५३ कीलोमीटर लांबीच्या कामासाठी तब्बल २९० कोटी रुपये खर्च करण्यात आले आहे परंतु या दोन्ही टप्प्यामध्ये अनेक ठिकाणी सिमेंट रोडला भेगा पडल्यामुळे रोड मोठ्या प्रमाणात खराब झालेला आहे. राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभागाने व संबंधित कंत्राटदाराने या गंभीर समस्येची दखल घेऊन तात्काळ महामार्गावरील भेगा पडलेले पॅनल उखडून चांगल्या दर्जाचे संपूर्ण नवीन पॅनल तयार करून राष्ट्रीय महामार्गाचे काम होणार का याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

gauravprakashan1@gmail.com

Maharashtra News, Braking News, Marathi News, Most Popular Marathi News, Latest Marathi News,Today News,Marathi Article, Marathi Poem, Marathi Story,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *