बार्शी : स्थनिक सोपल प्रशाला बार्शी व दत्त प्राथमिक विद्यामंदिर बार्शी या दोन्ही शाळेच्या विद्यमाने ११/१२/२०२१ वार शनिवार रोजी दिलीपराव दिलीपराव सोपल प्रशाला बार्शी येथ छत्रपती क्रीडा,शिक्षण व समाजसेवी संस्था, उपळाई(ठोंगे) या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा.श्री.मोहन (आण्णा) ठोंगे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शालेय साहित्य व खाऊचे वाटप करून वाढदिवस साजरा करण्यात आला.कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी श्री.छगन श्रीरंग जगताप सर न्यू इंग्लिश स्कुल गौडगाव प्रमुख पाहुणे म्हणून श्री.तुकाराम पिंपळे (इंजिनिअर),श्री चंद्रकांत नागणे (न.पा. शिक्षण मंडळ बार्शी) प्रमुख उपस्थिती म्हणून छत्रपती क्रीडा,शिक्षण व समाजसेवी संस्था, उपळाई(ठोंगे) संस्थेच्या उपाध्यक्षा सौ. तेजस्विनी ताई ठोंगे त्यांची कन्या मृनमयी ठोंगे व जयसिंगराव पाटील गुरुजी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस दत्त प्राथ. व दिलीपराव सोपल या दोन्ही प्रशालेच्या वतीने फेटा,हार व बुके देऊन मोहन अण्णा ठोंगे सरांना सन्मानित करण्यात आले तसेच प्रशालेत गणिताचे शिक्षक श्री.सचिन काळे यांचाही वाढदिवस असल्याने त्यांचाही सन्मान करण्यात आला मान्यवरांच्या हस्ते वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या अध्यक्षीय भाषणात जगताप सर म्हणले की जो परिस्थितीचा बाऊ न करता येणाऱ्या संकटाशी तोंड देतो तो यश मिळवतो.
सत्कारमूर्ती बद्दल बोलताना ते म्हणाले ठोंगे सरांनी खूप हाल अपेष्टा सोसून अतिशय खडतर परिस्थिचा सामना करत संस्थेची निर्मिती केली आहे त्यांच्या त्यागाचे चीज विद्यार्थ्यांनी मोठया पदावर जाऊन करावे व शाळेचे नाव उंच करावे ही अपेक्षा व्यक्त केली
मान्यवरांच्या हस्ते इयता १ ते १० वी वर्गातील मुलांना शालेय साहित्य वह्या, पेन,पेन्सिल तसेच खाऊ म्हणून बिस्कीट पुडे वाटण्यात आले कार्यक्रम यशस्वीतेसाठी श्री.चंद्रकांत लोखंडे(मुख्या), श्री.सादिक बागवान (मुख्या)श्री.युवराज जगताप , श्री. सुनील लंगोटे ,श्री.मंगेश मोरे श्री.श्रीकांत कुंभारे, श्री.सचिन काळे ,श्री.राहुल ठोंगे श्री.संतोष ठोंबरे ,श्रीम.संगीता काळे अरुणा मठपती सौ.विलंबिनी पवार ,श्री.संदीप भोरे श्री.दत्ता ठोंगे(सेवक)या सर्व शिक्षक बंधू भगिनी व सेवक यांचे सहकार्य लाभले अशाप्रकारे आनंदी वातावरणात शालेय साहित्य व खाऊ वाटप कार्यक्रम संपन्न झाला.