- फिरताना जंगलात
- भूक लागली कोल्ह्यास
- एक हरीण मेलेले
- सुरू केले रे खाण्यास
- मांस खाल्ले पटापट
- बघा काय ते घडले
- दिन उन्हाचे कडक
- सुके नरडे पडले
- शोधू लागला विहीर
- जीव कासाविस झाला
- उडी मारली पाण्यात
- नाही विचारही केला
- होती तहान जेवढी
- पिला पाणी मग कोल्हा
- वाट दिसेना वरती
- खूप केला हल्ला गुल्ला
- वर दिसता बोकड
- लावी त्यास लाडीगोडी
- बुद्धी बोकडांची मंद
- त्याने ही मारली उडी
- बोले बोकडास कोल्हा
- भिंतीकडे पाठ कर
- तुला बाहेर काढण्या
- जातो मी प्रथम वर
- केली लबाडी कोल्हयाने
- गेला वरती चढून
- दिला बोकडास दगा
- गेला पाण्यात सोडून
- श्री.युवराज गोवर्धन जगताप
- काटेगाव ता : बार्शी
- जिल्हा: सोलापूर
- 8275171227