Recent in Technology

Advertisement

Breaking News

फक्त एवढं करावं

    मोबाईलच्या डीपीवर
    जेवढं सुंदर फोटो आपलं
    दिसावं,
    तेवढंच सुंदर विचार
    इतराबदल आपलं असावं.
    जसं आपण रक्ताच नात
    सांभाळतो अगदी तसंच
    सर्वांचं प्रेमाचं, आपुलकीचं
    नातं जपावं.
    व्यसनाधीनाच्या आहारी
    न जाता जे मिळालं
    स्व :कष्टानं त्यातच
    कुटुंबासोबत समाधानी जगावं .
    घामाची किंमत काय असते
    ते कष्ट करून घाम
    गाळणाऱ्या आई बापाकडून शिकावं.
    समाजहित जोपासून
    शैक्षणिक ज्ञान संपादन करून
    इतरांपेक्षा काहीतरी वेगळं
    करून शिवरायासारखा
    इतिहास रचाव.
    सगळ्यात मिळून मिसळून
    गरीब श्रीमंताची दारे नष्ट
    करून आपुलिकीची
    भावना मनाशी बाळगून
    गर्दीतून फक्त आपणच
    उठून दिसाव .
    आपल्यामुळे कोणाच्याही
    डोळ्यात अश्रू झळकू
    देऊच नये असा स्वभाव
    जीवन जगताना स्वं :अंगी असावं.
    अहंकाराला बगल देऊन
    सर्वांशी आपलेपणाने,
    प्रामाणिक वागून
    कोणासोबतच वैर नसावं.
    -सुरेश बा.राठोड
    (कलाशिक्षक)
    राष्ट्रीय विद्यालय,भिवापूर जिल्हा.नागपूर
    9765950144
-----

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

People

Ad Code