मुंबई : राज्य सरकारने बुधवारी एसटी कर्मचार्यांच्या पगारात मोठी वाढ केली. पण, अँड. सदावर्ते यांनी विलिनीकरण होईपयर्ंत आंदोलन सुरुच ठेवण्याचा इशारा दिला आहे. एसटी कर्मचार्यांच्या संपाचा तिढा कायम आहे. यानंतर माध्यमांशी संवाद साधाना अनिल परब यांनी कर्मचार्यांना कडक शब्दात इशारा दिला आहे. आंदोलकांनी तुटेपयर्ंत ताणू नये. एसटी कर्मचार््यांची आम्ही शुक्रवार सकाळपयर्ंत वाट पाहू, त्यानंतर कठोर निर्णय घेऊ, असा स्पष्ट इशारा परिवहन मंत्री अनिल परब यांनी गुरुवारी दिला.
मागील अनेक दिवसांपासून सुरू असलेला राज्यातील एसटी कामगारांचा संप गुरुवारी संपणार, अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. पण, आंदोलनाचे नेतृत्व आपल्या हातात घेत अँड. गुणर% सदावर्ते यांनी विलीनीकरण होईपयर्ंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा गुरुवारी दिला आहे. यानंतर आता राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी कठोर भूमिका घेतल्याचा पाहायला मिळत आहे.
आंदोलनाबाबत बोलताना अनिल परब म्हणाले की, राज्य सरकारने आपली भूमिका कालच स्पष्ट केली आहे. आम्ही आमचा लेखाजोखा मांडला आहे. मागन्या मान्य झाल्यावर लढाई थांबवायची असते, पण काही कारणास्तव ते येत नाहीयेत. आम्ही आता उद्या सकाळपयर्ंत वाट पाहू, त्यानंतर कठोर निर्णय घेऊ. जे कर्मचारी संपात राहतील त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराच त्यांनी यावेळी दिला.
Copyright (c) 2022 Gaurav Prakashan All Right Reseved
0 टिप्पण्या