Translate

Gaurav Prakashan

Recent in Technology

Advertisement

Breaking News

प्रीत राधेची...

  गोकुळात नंदाघरी आला
  यशोदेचा गोंडस नंदलाला
  वेणुचे मंजुळ सुर ऐकण्या
  दंग ती मथुरेची ब्रीजबाला
  प्रीत राधेची मुरलीधरावरी
  गोकुळचाच कृष्ण कन्हैया
  खोड्या करीतो यमुनेतीरी
  बांधायची उखळाला मैया
  रंगांयचा खेळ वृंदावनात
  रासलीला गोपीकान्हाचा
  टिपरीवर टिपरी चढताच
  कसा होईल त्रास उन्हाचा
  रमतसे बाललीलांत मैया
  अवखळ तोच लाल भारी
  लाड करीतो बलरामदादा
  करायची तक्रार नर नारी
  मथुरेच्या बाजाराला जाता
  अडवीतसे कान्हा मग वाट
  मारूनीच खडे फोडायचा
  गोपींचा दुध दह्याचा माठ
  सौ.भारती सावंत
  मुंबई
  9653445835
-----

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

People

Ad Code