Featured Post

Translate

Gaurav Prakashan

Recent in Technology

Advertisement

Breaking News

कृषी निविष्ठा विक्रेत्यांसाठी डेसी (DEASI) प्रशिक्षण

    अमरावती, दि. 09 : कृषी निविष्ठा विक्रेत्यांसाठी डेसी (डिप्लोमा इन ॲग्रीकल्चर एक्सटेंशन सर्व्हीसेस फॉर इनपुट डीलर्स ) हा एक वर्ष कालावधीचा अभ्यासक्रम खत व कीटकनाशक परवान्यासाठी बंधनकारक आहे. त्यामुळे प्रादेशिक कृषी विस्तार व्यवस्थापन प्रशिक्षण संस्था, दुर्गापूरचे कृषी विज्ञान केंद्र, श्री शिवाजी कृषी महाविद्यालय व श्री शिवाजी उद्यानविद्या महाविद्यालयामार्फत जिल्ह्यातील कृषी सेवा केंद्रधारकांसाठी आठवड्यातून एक दिवस प्रशिक्षण घेण्यात येणार आहे. त्याला प्रवेश घेण्याचे आवाहन ‘आत्मा’च्या प्रकल्प संचालकांनी केले आहे.

    या प्रशिक्षण वर्गाची 160 व्यक्ती प्रवेश क्षमता असून 10 हजार रुपये प्रवेश शुल्क आहे. या प्रशिक्षणाच्या प्रवेशासाठी उमेदवार हा कमीत कमी इयत्ता 10 वी पास व कृषी निविष्ठा विक्रीचा परवाना त्याच्याकडे असणे आवश्यक आहे. आवश्यक कागदपत्रे इयत्ता दहावी किंवा बारावी पास प्रमाणपत्र व गुणपत्रक, आधार कार्ड, चार पासपोर्ट साईज फोटो, कृषी निविष्ठा विक्रीचा परवाना आदी कागदपत्रे प्रवेशासाठी आवश्यक राहील.v

      प्रकल्प संचालक, आत्मा कार्यालय, विसावा कॉलनी, जुना बायपास रोड, अमरावती (दुरध्वनी क्रमांक -0721-2660012) या ठिकाणी प्रवेश अर्ज मिळेल व स्वीकारण्यात येईल. सर्व तालुक्यांतील कृषी विक्रेत्यांनी छायांकित कागदपत्रासह परिपूर्ण भरलेले प्रवेश अर्ज दोन प्रतीत दि. 11 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबरदरम्यान सकाळी 11 ते 5 पर्यंत सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

      प्राप्त अर्जांमधून सोडत पद्धतीने प्रशिक्षणार्थीची निवड करण्यात येईल. उमेदवारांनी अर्ज दोन प्रतीत सादर करावा. तसेच प्रवेश अर्ज http://www.manage.gov.in या वेबसाईटवर सुध्दा उपलब्ध आहे. यापूर्वी अर्ज केलेल्यांनी नवीन बॅचकरीता पुन्हा अर्ज करणे अनिवार्य राहील. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे कार्यालयात प्रवेश करतांना हॅन्ड सॅनिटायझर व मास्कचा उपयोग अवश्य करावा. कोरोनो महामारीच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा उपाय म्हणून सामाजिक अंतराच्या पालन करावे, असे आवाहन प्रकल्प संचालकांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

People

Ad Code