मुंबई : राज्यात डिसेंबरमध्ये कोरोनाची तिसरी लाट येण्याचा धोका आहे. मात्र या लाटेची तीव्रता कमी असू शकते. लोकांनी घाबरू नये. मात्र काळजी घ्यावी, असे आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले.
देशात आलेली कोरोनाची दुसरी लाट मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यानंतर ओसरली. त्यानंतर कोरोना रुग्णाची संख्या कमी होऊ लागली. कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात आल्याने अनेक जण बेफिकीरीने वागू लागले. त्यामुळे कोरोनाचा धोका वाढला आहे. राज्यात डिसेंबरमध्ये कोरोनाची तिसरी लाट डिसेंबरमध्ये येऊ शकते. मात्र तिची तीव्रता जास्त नसेल. राज्यातील लसीकरणाचा वेग चांगला आहे. त्यामुळे तिसर्या लाटेची तीव्रता फारशी नसेल, असे आरोग्य मंत्री डॉ. राजेश टोपे यांनी म्हटले. कोरोनाची पहिली लाट सप्टेंबर २0२0 मध्ये, तर दुसरी लाट एप्रिल २0२१ मध्ये आली होती.
राज्यातील ८0 टक्क्यांहून अधिक जणांना लस देण्यात आली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात लसीकरणानं महत्त्वाची भूमिका बजावली आहे. आधीच्या तुलनेत संक्रमणाचा वेग कमी आहे. मृत्यूदर जवळपास शून्याच्या जवळ आहे. मात्र डिसेंबरमध्ये कोरोनाची तिसरी लाट येऊ शकते. मात्र लसीकरणाचा वेग चांगला असल्यानं प्रादुर्भाव फारसा नसेल. या कालावधीत आयसीयू आणि ऑक्सिजनची आवश्यकतादेखील कमी भासेल, असे टोपे यांनी सांगितले.
0 टिप्पण्या