Header Ads Widget

शेतकरी पुत्रांचा रक्तयज्ञ

    * कृषी कायद्यांिवराेधातीत आंदोलनाच्या वर्षपूर्तीनिमित्त रक्तयज्ञ
    * शेतकरी जागर मंचाचा पुढकार

    अकाेला : कृषी कायदे रद्द करावेत, या मागणीसाठी दिल्लीच्या सीमांवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला एक वर्ष पूर्ण हाेण्याच्यानिमित्ताने २४ नाेव्हेंबर राेजी रक्तयज्ञ अर्थात रक्तदान शिबिर पार पडले. केंद्र सरकारच्या डाेळ्यात अंजन भरणाऱ्या या अाक्रमक अांदाेलनासाठी शेतकरी जागर मंचाने पुढाकार घेतला. िजल्हाधिकारी कार्यालयासमाेर झालेल्या अांदाेलनात १९० युवकांनी रक्तदान केले. तसेच ४०० पेक्षा जास्त जणांनी रक्तकुंडीत अापल्या रक्ताचा एक थेंब टाकत एक बुंद शहिदाेंके नाम, असा नारा देत पाेशिंद्यासाठीचे अांदाेलन अाणखी तीव्र करण्याचा निर्धार केला. ही रक्तकुंडी प्रधानमंत्री कार्यालयात पाेहाेचविण्यात येणार अाहे. अांदाेलनात मंडपात भाजपसह शिवसेना, कांॅग्रेस, राष्ट्रवादी कांॅग्रेस, अाम अादमी पक्ष, एमअायएम व वंचित बहुजन अाघाडीच्या नेत्यांनी येत स्वत:च्या रक्ताचा थेंब रक्तकुंडीत अर्पण केला. या कुंडीत कडधान्य व कापूसही हाेता.

    केंद्र सरकारने केलेल्या तीन कृषि कायद्यांच्या विरोधात शेतकऱ्यांनी राजधानी दिल्लीच्या सीमेवर २६ नाेव्हेंबर २०२०पासून अांदाेलन सुरू असून या अांदाेलनाला जिल्हयातील दिवसेंदिवस पाठिंबा वाढतच अाहे. तीनही कृषी कायदे संसदेत रद्द करावेत, किमान आधारभूत किंमतीला कायदेशीर हमी द्यावी, या शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्यांसाठी ते आग्रही आहेत. दरम्यान शेतकऱ्यांच्या कृषी स्वातंत्र्य संग्रामत अग्रस्थानी असलेल्या शेती जागर मंचाने कायद्यांिवराेधात अाणखी अाक्रमक भूिमका घेतली अाहे. २४ नाेव्हेंबर राेजी जिल्हाधिकारी कार्यालयासमाेर शेतकऱ्यांच्या मुलांनी रक्तयज्ञ करीत सरकारला रक्ताची भाष समजत असेल तर यानंतर अामचीही तयारी अाहे, असाच संदेश दिला.

    जिल्हाधिकारी कार्यालयासमाेर रस्त्याच्या बाजूला माेठा मंडप टाकून रक्तदानासाठी १० खुर्च्चांची व्यवस्था करण्यात अाली हाेती. सकाळी १० ते ५ वाजतापर्यंत एकही खुर्ची िरकामी नव्हती. रक्तदानाची सुरूवातच पाेिलस कर्मचाऱ्यापासून झाली. त्यानंतर दुपारी सध्या सुट्टी असलेला सैन्यातील जवान महेश वानखडेही सहभाग नाेंदवला. रक्तदान संकलन सर्वाेपचार रुग्णालय, जिल्हा स्त्री रुग्णालय व अकाेला ब्लाड बंॅकेतर्फे करण्यात अाले. रक्तदानाच्या ठीकाणी चहा,पाणी, फराळाची व्यवस्था करण्यात आली.

    रक्ताच्या थाराेळ्यात पडलेला अामचा बाप नजरेस पडल्यानंतर शेतकरी पुत्रांनी शांत बसणे शक्त नाही. गांधींच्या देशात शांततेच्या मार्गेने अाजही अाम्ही सरकारसाेबत संवाद साधण्याचा प्रयत्न करीत अाहाेत. शेतकरी पुत्रांनी सरकारसाेबत प्रसंगी रक्ताच्याच भाषेत बाेलण्याचा निर्धार केला. पंतप्रधानांनी कायदे मागे घेण्याची घाेषणा केली तरी कायदे मागे घेण्याची प्रक्रिया संसदेत हाेणे अावश्यक अाहे. त्यानंतरच अांदाेलनाची पुढील दिशा िनश्चित करण्यात येणार असल्याचे अांदाेलकांनी स्पष्ट केले. केंद्रातील सरकार व त्या पक्षाने दाेन काेटी राेजगार, १५ लाख रुपये प्रत्येकाच्या खात्यात जमा करणे, शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणे, अशी अनेक अाश्वासनं दिली हाेती. मात्र ही अाश्वासने पूर्ण झालेली नाहीत. त्यामुळे केंद्र सरकारवर िवश्वास कसा ठेवावा, असा सवाल शेतकरी पुत्रांनी अांदाेलनादरम्यान केला.

-----

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या