Recent in Technology

Advertisement

Breaking News

ग्रामीण विकासासाठी..

    आपला देश पूर्वापार शेतीप्रधान असून आजही बरीच मोठी लोकसंख्या शेतीवर अवलंबून आहे. आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे देशाच्या अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी ग्रामीण भागाचा आणि शेतीक्षेत्राचा विकास घडवणं महत्त्वाचं ठरत आहे. या पार्श्‍वभूमीवर अलिकडे कॉर्पोरेट वर्ल्ड, वर्ल्ड बँक, इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन आदी रुरल डेव्हलपमेंटकडे जाणीवपूर्वक लक्ष घालत आहेत. सरकारच्या नानाविध योजना ग्रामीण ावकासासाठी महत्त्वाची कामागरी बजावत आहेत.

    अशा परिस्थितीत रुरल मॅनेजमेंटशी संबंधित अभ्यासक्रम अभ्यासायला हवे. एखादा साधासा अभ्यासक्रमही ड्रम जॉब देऊ शकेल. याच्याशी संबंधित डिप्लोमा, डिग्री किंवा पीजी कोर्स चांगलं व्यासपीठ मिळवून देण्यास सक्षम आहे.

    अनेक विद्यापीठांमध्ये रुरल मॅनेजमेंट संबंधित अभ्यासक्रम आखले जातात. आजकाल बहुसंख्य कंपन्या ग्रामीण भागामध्ये उद्योगाचा वस्तार करण्याच्या योजना आखत आहेत. देशातील अग्रणी मॅनेजमेंट इन्स्टिट्युट्सही रुरल मॅनेजमेंटच्या विद्यार्थ्यांना प्राधान्य देतात. या सार्‍या बाबी लक्षात घेता रुरल मॅनेजमेंटकडे चांगली संधी म्हणून पहाणं महत्त्वाचं ठरणार आहे. ग्रामीण भागाकडे ओढा असणार्‍यांनी या संधीचा अवश्य विचार करायला हवा.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

People

Ad Code