आदळणारे दरवाजे,
अन खिळखिळणाऱया खिडक्या घेऊन,
राज्यभर हिंडणारी
ती टपरी असाे, टुपरी असाे,
पण माझी एसटी आहे.
कुणी तिच्यावर दगड फेकाे
कुणी पान खाऊन थुंकाे
पण ती लाडकी लालपरी आहे
ती बिचारी कुठेही पंक्चर झाली
वाटेतच फाेडली गेली
पण प्रवाशांना तिने
वाऱयावर साेडले नाही..
मागच्या सिटवर तिने
लाेकांचे मनके ताेडले
पण कधी मनं ताेडले नाहीत
रेटारेटी, भाडेवाढ, हमरीतुमरी
पाहत ती खिळखिळी झाली
पश्चिम महाराष्ट्रातून
विदर्भातल्या दगड धाेंड्यात गेली
पण कधी नव्या साजासाठी भांडली नाही
तिने कधीही हट्ट मांडला नाही
की मला गुबगुबीत सीटं द्या
आरामदायक खुर्च्या द्या
आत टीव्ही किंवा एसी द्या
बिचारी दिलेल्या वायफायमध्ये समाधानी आहे
नखं, पेन किंवा कलदार हाती घेऊन
टवाळखाेर पाेरांनी...
तिच्या चारित्र्यावर डाग लावले
कुणी दिलच्या आकारात
RJ, PK, KP, I Love you
सारखी अक्षरं लिहून
प्रेमभावना व्यक्त केल्या
पण एसटे तू तक्रारली नाहीस
अग काही प्रेमविरांना तर
चुंबनासाठी तुझ्या मागच्या सिटचा काेपरा
आजही सेफ वाटताे..
गुटखा खाणाऱयांना थुंकण्यासाठी
सिटाशेजारची जागा सेफ वाटते
आेकणाऱयांना मागच्या खिडक्या सेफ वाटतात
एसटे.. तिकीटं बदलली....
तिकीटांची मशीन बदलली...
पंचिंग मशीनने खांब ठाेकत,
भाडे मागणारा कंडक्टर बदलला
पण एसटे दुखः एकच गं
खिडकीतून रूमाल टाकून
सिटावर ताबा मिऴवणाराे
आम्ही तेच आहाेत..
आज तुझ्या नाेकरदारांनी संप पुकारला..
राज्यभर बसस्थानकं आेस पडली..
इथं व्यवस्थाच विचित्र आहे..
लेक्चर मीस करून
सिगारेट फुकत बसणाऱया प्राध्यापकांना (अपवाद)
येथे सातवा वेतन मिळताे
पण दिवसभर तुझ्यासंग फिरून
रात्री सिटावर डुलकी घेणाऱयाला भांडावं लागतं.
एसटे.. तुझ्या या खिळखिळ्या स्वरूपाची किव येते
पण स्थानकातली धुळ उडवत
फलाटावर तू ठ्या दिशी उशी राहली
अन माथ्यावर माझ्या गावाची पाटी असली की बरं वाटतं
पण एसटे आज तू आगारात नाही
जणू जीव जिवात नाही..
- महेश घोराळे
अकोला
9340061694
0 टिप्पण्या