आठवतं मला माझ्या माहेराचे घर
भले मोठे आहे ते दोन अंगणाचे
पुढच्या अंगणात तुळशीचे वृंदावन
सगळे राहती एकत्र एका कुटुंबाचे.
घरच्या सगळ्या सुवासिनी पुजन
करुनी घालती प्रदक्षणा तुळशी भोवती
तुळस ही फोवावे देऊनी खूप मंजिरी
वृंदावना भवती इवले इवले रोपटी उगवती.
भारतीय परंपरा मराठमोळी संस्कृती
घरा घरात जपली जाते तीे वृंदावनाने
पाहुणे येताच स्वागत करते ती तुळस
येणाऱ्या प्रत्येक पाहुण्याचे आनंदाने.
तुळशी लग्न सोहळा कार्तिकी द्वादशीला
भटजीे लावी मंगलाष्टकांनी साळीग्रामाशी
खऱ्या लग्नाचा आनंद लाभत होता मुलांना
अजून ही गोड आठवणी आहेत हृदयाशी.
आता नाहीत तशा बायका सगळ्या तेथे
पण जेवढ्या आहेत तेवढ्या सगळं करतात
आपली रीत रिवाज पाळून सगळं करतात
मी माहेरी कधी गेले की त्या मला आठवतात.
- शोभा वागळे
0 टिप्पण्या