Featured Post

Translate

Gaurav Prakashan

Recent in Technology

Advertisement

Breaking News

झोपडीत माझ्या येशील का..?

सांग प्रिये आठवणीच्या झोपडीत माझ्या येशील का..?
आठवणीच्या हिंदोळ्यावर मजजवळ बसून झूलशिल का..?

पाला पाचोळा गोळा करून साकारलेल्या आठवणीच्या झोपडीत माझ्या
तुझ्या मनातील कल्पकता वापरून झोपडी सुशोभित करशील का..?

झिजून गेला जीव माझा कष्ट उपसत असताना या जिवाच्या पदरात नवं चैतन्य निर्माण करशील का..?

मृगनयनीच्या सप्तरंगात रम्य प्रहरी
प्रखर सूर्य किरणांनी सार जग उजळून निघाव अगदी तसच मनात रंग माझ्या भरशील का..?

नटलेल्या सांज पावलांनी आठवणीच्या घरट्यात पदार्पण करून झोपडी माझी प्रकाशमान करशील का..?

फुललेल्या वेलीवर फुलाचा सुगंध  माझ्या जीवनात दरवळशील का..? मनातल्या भावना अलगद तुझ्या विचाराची  देवाण घेवाण करून संवाद माझ्याशी साधशील का..?

संसार रुपी आयुष्याचा खेळ सारा माझ्या सोबत खेळशील का..? जीवन माझं दुःख मय डोंगर देऊनी जीवाला आधार खळखळून मनाला हसवशील का..?

आयुष्य फार छोटं आहे सत्कर्माच्या मार्गावर जात असताना सोबत मला घेशील का..?
खरंच सांग प्रिये आठवणीच्या झोपडीत माझ्या येशील का...

 -सुरेश बा.राठोड
(कलाशिक्षक)
राष्ट्रीय विद्यालय,भिवापूर.
जिल्हा.नागपूर.
9765950144

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

People

Ad Code