Header Ads Widget

रिझर्व्ह बँकेच्या दोन योजनांचा आज गुंतवणूकदारांसाठी शुभारंभ

    नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी १२नोव्हेंबरला सकाळी ११ वाजता दूरदृष्य प्रणालीद्वारे रिझर्व्ह बँकेच्या ग्राहक केंद्री दोन अभिनव योजनांचा प्रारंभ करणार आहेत. आरबीआय रिटेल डायरेक्ट स्कीम अर्थात आरबीआय किरकोळ गुंतवणूकदारांसाठी प्रत्यक्ष योजना आणि रिझर्व बँक- एकात्मिक लोकपाल योजना या दोन योजनांचा शक्र वारी प्रारंभ होणार आहे.

    किरकोळ गुंतवणूकदारांना सरकारी रोखे बाजारात व्यापक प्रवेश शक्य व्हावा हा आरबीआय रिटेल डायरेक्ट योजनेचा उद्देश आहे. भारत सरकार आणि राज्य सरकारांनी जारी केलेल्या रोख्यांमध्ये किरकोळ गुंतवणूकदारांना थेट गुंतवणूक करण्याची नवी संधी या योजनेद्वारे प्राप्त होणार आहे. गुंतवणूकदार, आरबीआय समवेत सुलभपणे आणि मोफत त्यांचे सरकारी रोखे खाते ऑनलाईन उघडू शकतील.

    रिझर्व बँकेकडून नियमन केल्या जाणार्‍या संस्थाविरुद्धच्या ग्राहकांच्या तक्रारींचे निवारण करण्याची यंत्रणा सुधारण्याचा, रिझर्व्ह बँक एकात्मिक लोकपाल योजनेचा उद्देश आहे.

-----

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या