अमरावती : संविधानाबाबत जनजगृती करण्यासाठी तसेच अमरावती शहरामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा प्रसार करण्याच्या उद्देशाने अमरावती स्पंदन परिवार बहुऊद्देशीय संस्था संचालित बीइंग आर्टिस्ट अकादमी ऑफ फिल्म अँड थिएटर आर्टस्, अमरावती तर्फे २६/११/२०२१ रोजी संविधान दिनाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी बीइंग आर्टिस्ट अकादमी ऑफ फिल्म अँड थिएटर आर्टस् चे स्संस्थापक पंकज धंदर, संचालक स्नेहा वासनिक, नंदकिशोर गवळी ,अमित जगताप ,पंकज तोवर उपस्तित होते. कार्यक्रमाची सुरवात अकॅडमि मध्ये प्रास्ताविक - उद्देशिका व राष्ट्रगीताने करण्यात आली. भारतीय संविधानाला संबोधून 'भारतीय संविधान हे शाळा- महाविद्यालय मध्ये विशेष विषय म्हणून ''संविधान" शिकवणे आवश्यक असल्याचे मत संस्थापक पंकज धंदर यांनी व्यक्त केले. तसेच सर्व विद्यार्थ्यां शेगाव येथे स्तिथ डॉ बाबासाहेब आंबेडकर याच्या पुतळ्याला वंदन करून दीप प्रज्वलित केले, तसेच उपस्थित मान्यवरांसोबत संविधान प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन करून प्रास्ताविकेच्या प्रतीचे वाटप करण्यात आले. संविधानाबाबत जनजागृती करण्यासाठी तसेच अमरावती शहरामध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा प्रसार करण्याच्या उद्देशाने प्रत्येकी दोन विद्यार्थी शहरातील विविध चौकामध्ये उभे राहून संविधान प्रास्ताविकेच्या प्रतीचे वाटप करून संविधान आणि प्रास्ताविकेचे महत्व पटवून दिले.
भारतीय संविधानाचे घटनाकार भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर याच्या सम्मानार्थ अमरावती स्पंदन परिवार बहुदेदेशीय संस्था संचालित बिईंग आर्टिस्ट अकॅडमि ऑफ फिल्म्स अँड थेटर आर्ट तर्फे २६ नोव्हेंबर २०२१ रोजी राबविण्यात आलेली संविधान जनजागृती मोहीम "एकदा तरी वाचा, समजून घ्या आणि अंगीकृत करा" असे म्हणत पूर्ण करण्यात आली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करतांना संविधान दिनाचा थोडक्यात इतिहास आशिष खांडेकर यांनी सांगितला. तसेच कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कार्तिक पवार ,नागेश रंगारी ,हर्षल कुराडे , आकाश पांडे ,मयूर चौधरी ,प्रज्वल वानखडे ,पवन ठाकरे ,सूरज सिंग चौहान ,अक्षय डफडे यांनी अथक परिश्रम घेतले.
Copyright (c) 2022 Gaurav Prakashan All Right Reseved
0 टिप्पण्या