Header Ads Widget

छत्रपती शाहू महाराज

  छत्रपती शाहू । राजाच्या रुपात।
  जन्मले ग्रामात । कागलात॥१॥
  शाहुंचे संस्थान । एक कोल्हापूर।
  कार्य सर्वदूर । भारतात॥२॥
  पेटवून दिली । प्रकाशाची वात।
  तिमिराची रात । संपविली॥३॥
  बोले तैसा चाले । कर्ते सुधारक।
  प्रजेचे नायक । कर्मानीच॥४॥
  छत्रपती शाहू । सर्वाना शिक्षण ।
  बोर्डिंग स्थापन।संस्थानात॥५॥
  आरक्षण दाते । पहिलेच राजे।
  बहुजन राजे । कोल्हापुरी॥६॥
  शाहुंच्या कार्याला । करितो नमन।
  करांनी वंदन । कोटी कोटी॥७॥
  -प्रा.अरुण बाबारावजी बुंदेले,
  अमरावती(महाराष्ट्र)
  भ्र.ध्व.:-८०८७७४८६०९
  Email ID :arunbundele1@gmail.com -----

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या