Header Ads Widget

थंडीतली स्टाईल

    आता थंडीचे दिवस सुरू झाले आहेत. साहजिक ऊबदार कपड्यांची तयारी सुरू करावी लागेल. सर्वसाधारणपणे थंडीत स्वेटर, ज्ॉकेट कॅरी केले जातात. प्रसंगी शालीला पसंती असते. पण प्रत्येक वेळी शाल गुंडाळणं, स्वेटर घालणं शक्य नसतं. वेगळं ट्राय करायचं तर पोंचोचा पर्याय आहे. हा कॅज्युअल, पार्टी वेअर म्हणून कॅरी करू शकता.

    'टी शर्ट, स्वेट शर्टवर केप स्टाईल पोंचो घालता येईल. गाऊ न किंवा लाँग स्कर्टवर हा प्रकार शोभून दिसेल. फ्लोरल, प्लेन, चेक्स, स्ट्राईप्स या प्रकारांमधून तुम्ही केप स्टाईल पोंचोची निवड करू शकता. ' जीन्स किंवा एथनिक्सवर फुल लेंथ किंवा फ्लोअर लेंथ पोंचो वापरावा. ' आवड आणि गरजेनुसार व्ही, राउंड किंवा हाय नेकवाले पोंचो घेता येतील. ' समारंभासाठी लोकरीवर थ्रेड, मरर वर्क तसंच नक्षीकाम केलेले पोंचो खरेदी करू शकता. ' आजकाल फेदर किंवा फिं्रज पोंचोचा ट्रेंड आहे. ही स्टाईलही छान दिसते. ' नेहमीच्या हुडीपेक्षा पोंचो विथ हुडीमुळे हटके लूक मिळेल.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या